मुंबई | टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभयसंघात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर आयर्लंड दौरा, आशिया कप स्पर्धा 2023 आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा 2023 या वर्षात क्रिकेटचा भरगच्च असा कार्यक्रम आहे. या दरम्यान आता बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या साऊथ आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाचा हा दक्षिण आफ्रिका दौरा जवळपास 1 महिन्याचा असणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून टी 20 मालिकेने होणार आहे. तर शेवट टेस्ट सीरिजने होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात प्रत्येकी 3 सामन्यांची टी 20 आणि एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. तर टेस्ट सीरिजमध्ये 2 मॅचेसचं आयोजन करण्यात आलंय.
टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक
BCCI and @ProteasMenCSA announce fixtures for India’s Tour of South Africa 2023-24.
For more details – https://t.co/PU1LPAz49I #SAvIND
A look at the fixtures below ?? pic.twitter.com/ubtB4CxXYX
— BCCI (@BCCI) July 14, 2023
10 डिसेंबर, साऊथ आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, डरबन.
12 डिसेंबर, साऊथ आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, जेकेबरहा.
14 डिसेंबर, साऊथ आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, जोहान्सबर्ग.
17 डिसेंबर, साऊथ आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, जोहान्सबर्ग.
19 डिसेंबर, साऊथ आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, जेकेबरहा.
21 डिसेंबर, साऊथ आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, जोहान्सबर्ग, पार्ल.
पहिला कसोटी सामना, 26-30 डिसेंबर, सेंच्युरिएन
दुसरा कसोटी सामना, 3-7 जानेवारी, केप टाऊन.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 या साखळीतील दुसरी परदेशी मालिका दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा बॉक्सिंग डे टेस्ट असणार आहे. हा सामना 26 ते 30 डिसेंबर सेंच्युरियन इथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा नववर्षात म्हणजेच 2024 मध्ये 3 ते 7 जानेवारी पार पडणार आहे.
दरम्यान टीम इंडियाने याआधी 2021-22 मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. त्या दौऱ्यात टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा फरकारने पराभूत झाली होती.