आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया भिडणार आहेत. हा सामना 29 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे बारबाडोसमधील किंग्स्टन ओव्हल मैदानात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची तिसरी वेळ ठरली आहे. तर दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत पोहचण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा आहे. तर एडन मारक्रम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघातील हेड टु हेड आकडेवारी जाणून घेऊयात.
टीम इंडिया -दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 26 टी20i सामने झाले आहेत. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 26 पैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेला 11 सामन्यात यश मिळवता आलं आहे. तर उभयसंघात टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 6 वेळा आमनासामना झाला आहे. इथेही टीम इंडियाचाच बोलबाला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेला 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे.
दरम्यान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर सुपर 8 मध्ये टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम राखली. तर उपांत्य फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवत फायनलमध्ये प्रवेश केला. तर दक्षिण आफ्रिकेने साखळीतील 4 आणि सुपर 8 मधील 3 सामने जिंकले. तसेच उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता अंतिम फेरीत कोण बाजी मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.