मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर क्रिकेट टीम इंडियाची युवा गँग ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथा सामना हा शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी रायपूरमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सूर्याच्या नेतृत्वात आतापर्यंत गोलंदाजीचा अपवाद वगळता टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे.
भारतीय क्रिकेट संघ या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या दौऱ्याला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी घोषणा होणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अनुक्रमे टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी 3 टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका असणार आहे. तर 2 कसोटी सामने असणार आहे. आता बीसीसीआय एका झटक्यात तिन्ही मालिकांसाठी संघाची घोषणा करते की टप्प्याटप्याने संघ जाहीर करते, याकडे लक्ष लागून आहे.
टी 20 मालिका
पहिला सामना, रविवार 10 डिसेंबर.
दुसरा सामना, मंगळवार 12 डिसेंबर.
तिसरा सामना, गुरुवार, 14 डिसेंबर.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा?
Indian team for the South Africa tour is likely to be announced tomorrow. [Abhishek Tripathi] pic.twitter.com/bPcxiir3Po
— Johns. (@CricCrazyJohns) November 29, 2023
वनडे सीरिज
पहिली मॅच, रविवार 17 डिसेंबर.
दुसरी मॅच, मंगळवार 19 डिसेंबर.
तिसरी मॅच, गुरुवार 21 डिसेंबर.
कसोटी मालिका
पहिला सामना, 26 ते 30 डिसेंबर.
दुसरा सामना, 3 ते 7 जानेवारी.