SA vs IND | दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय, कॅप्टन K L Rahul ची ऐतिहासिक कामगिरी

| Updated on: Dec 22, 2023 | 12:57 AM

SA vs IND Odi Series 2023 | टीम इंडियाने मालिकेत विजय मिळवून दणक्यात सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने जोरदार कमबॅक करत हिशोब बरोबर केला. टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून मालिकाही जिंकली.

SA vs IND | दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय, कॅप्टन K L Rahul ची ऐतिहासिक कामगिरी
Follow us on

पार्ल | भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका टीमवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 297 धावांचं आव्हान दिलं होतं. या मालिकेत दोन्ही संघांनी सामना जिंकला होता. त्यामुळे तिसरा सामना मालिकेच्या हिशोबाने निर्णायक होता. दोन्ही संघांना सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी होती. टीम इंडियाला त्यासाठी 10 विकेट्सची गरज होती. तर दक्षिण आफ्रिकेला 297 धावा करायच्या होत्या. मात्र यात टीम इंडिया यशस्वी ठरली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 218 धावांवर रोखलं. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका ही 2-1 ने जिंकली.

कॅप्टन केएल राहुल याच्या नेतृ्त्वात टीम इंडियाने या मालिका विजयासह इतिहास रचला आहे. केएल राहुल टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकवणारा दुसराच कर्णधार ठरला आहे. केएलच्या आधी विराट कोहली याने ही कामगिरी केली होती. विराट कोहली याने टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्याच घरात 5-1 अशा फरकाने वनडे सीरिजमध्ये पराभव केला होता. टीम इंडियाने 2018 मध्ये ही मालिका जिंकली होती. त्यानंतर आता 2023 मध्ये 5 वर्षांनी टीम इंडियाने मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेने वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2022 मध्ये 0-3 अशा फरकाने सुपडा साफ केला होता. तेव्हाही केएल राहुल कॅप्टन होता. टीम इंडियाला तेव्हा एकही सामना जिंकता आला नाही. मात्र यंदा 2-1 ने पराभूत करत टीम इंडियाने मालिका जिंकलीय. दरम्यान टी 20, वनडे सीरिजनंतर उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

विराटनंतर केएल दुसराच कॅप्टन

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.