मुंबई | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज होणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच दक्षिण आफ्रिका टीमचीही 4 डिसेंबर रोजी घोषणा करण्यात आलेली आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून टी 20 मालिकेने होणार आहे. तर रोहित शर्मा कसोटी मालिकेत कॅप्टन्सी करणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी आयसीसीने अंपायर्सची नावं जाहीर केली आहेत. पहिल्या सामन्यात पॉल रिफएल आणि रिचर्ड केटलबोरो अंपायर असणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यासाठी रिचर्ड केटलबोरो आणि अहसाना राजा ही जोडी अंपायरिंग करणार आहे. टीम इंडियाठी अंपायर रिचर्ड केटेलबोरो हा अनलकी राहिला आहे. अंपायर रिचर्ड केटेलबोरो आणि टीम इंडियाचं मोठ्या स्पर्धेत पराभवाचं असं नातं राहिलं आहे.
टीम इंडिया आणि केटेलबोरो यांच्यातील पराभवाची मालिका 2014 पासून सुरु आहे. टीम इंडियाला नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा केटेलबोरो अंपायर होते. त्याआधी केटलबोरो 2014 च्या वर्ल्ड कप फायनल, 2015 वर्ल्ड कप सेमी फायनल, 2016 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि 2017 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या सर्व सामन्यांमध्ये केटेलबोरोच अंपायर होते. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि वर्ल्ड कप 2019 सेमी फायनलमध्येही टीम इंडियाच्या सामन्यात केटलबोरोच अंपायर होते.
तो पुन्हा आला
Umpires for India vs South Africa Test series. [TOI]
1st Test – Paul Reiffel and Richard Kettleborough
2nd Test – Richard Kettleborough and Ahsan Raza pic.twitter.com/QNBF6oxZ6R
— Johns. (@CricCrazyJohns) December 4, 2023
टीम इंडिया आणि क्रिकेट चाहते अजून वर्ल्ड कप फायनल पराभवातून बाहेर पडलेले नाहीत. त्यात आता केटेलबोरो टेस्ट सीरिजसाठी पुन्हा अंपायर म्हणून आल्याने भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.
कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका | टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, गेराल्ड, टोनी डी जोरजी, डीन एल्गर, मार्को जानेसन, केशव महाराज, एडेन मार्करम, वियान मुल्डर, लुंगी एंगिडी, कीगन पीटरसन, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरिन.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी (फिटनेसवर अवलंबून) आणि प्रसीध कृष्णा.
टेस्ट सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 26 ते 30 डिसेंबर, सेंचुरियन.
दूसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, केपटाउन.