मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केप टाऊन येथे सुरू आहे. आफ्रिका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजचा दिवस टीम इंडियाच्या गोलंदाजांनी गाजवला. आफ्रिका संघाचा पहिला डाव 55 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद सिराज याच्या घातक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांनी नांगी टाकली. एकट्या सिराजनेच सहा विकेट तर बुमराह आणि मुकेश कुमारने दोन विकेट घेतल्या. सिराजने आज सहा विकेटसह मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो टीम इंडियाचा पहिला गोलंदाज ठरला आहे.
मोहम्मद सिराज याने आफ्रिका संघाच्या बॅटींग लाईन अपला सुरूंग लावला होता. पठ्ठ्याने सहा विकेट घेत यजमान आफ्रिका संगाला बॅकफूटला ढकललं. साऊथ आफ्रिकेमध्ये अशी कामगिरी करणारा सिराज तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोहम्मद सिराज याने फक्त पंधरा धावा खर्च करत पाचपेक्षा जास्त विकेट घेतल्या.
साऊथ आफ्रिकेमध्ये एका डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम शार्दुल ठाकुर याच्या नावावर होता. शार्दुल ठाकुर याने 2022 साली 61 धावा देत 7 विकेट घेतल्या होत्या. त्याआधी हरभनज सिंह याने 2011 साली 120 धावा देत 7 विकेट घेतल्या होत्या. तर मोहम्मद सिराज याने या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. सिराजने आणखी एक विकेट घेतली असती तर तो यादीमध्ये पहिल्या स्थानी असता. महत्त्वाचं म्हणजे सिराजने अवघ्या पंधरा धावा देत 6 विकेट घेतल्या आहेत. पहिल्या सेशनमध्येच सहा विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी