विराट कोहली, टीम इंडियाचा दिग्गज अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार. विराट कोहलीने आपल्या एकट्याच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले. मात्र विराटला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विराटने सेमी फायनलपर्यंत एकूण 7 सामन्यांमध्ये मोजून 75 धावा केल्या. मात्र विराटने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना संकटमोचक खेळी केली. विशेष बाब म्हणजे विराटने ते करुन दाखवलं, जे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी फायनलआधी याबाबत भविष्यवाणी केली होती.
विराटसाठी फायनलआधी संपूर्ण स्पर्धा फार निराशाजनक राहिली. विराटच्या 7 डावातील 75 धावांमध्ये एकाही अर्धशतकाचाही समावेश नव्हता. विराटला एकेक धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. कॅप्टन रोहितला इंग्लंड विरूद्धच्या सेमी फायनलनंतर विराटच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित म्हणाला की “कदाचित तो आपल्या साऱ्या धावा अंतिम फेरीसाठी राखून ठेवत आहे”. रोहित जे म्हणाले ते विराटने अंतिम फेरीत खरं करुन दाखवलं.
विराटने टीम इंडिया अडचणीत असताना दक्षिण आफ्रिके विरुद्ध 59 बॉलमध्ये 76 धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीत 6 चौकार आणि 2 सिक्सचा समावेश होता. मात्र त्यानंतरही विराटच्या या खेळीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, त्याचं कारण स्ट्राईक रेट. तसेच विराटच्या टी 20I कारकीर्दीतील सर्वात संथ अर्धशतक ठरलं. दरम्यान विराटने या टी 20 वर्ल्ड कपमधील एकूण 8 डावात 1 अर्धशतकासह 151 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.