SA vs IND: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक

| Updated on: Jun 21, 2024 | 4:24 PM

India Tour Of South Africa 2024: टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

SA vs IND: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक
IND VS SA
Follow us on

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत साखळी फेरीनंतर सुपर 8 मध्ये विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयाच्या काही तासांनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपनंतर भारतात बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. बीसीसीआयने 20 जून रोजी टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध कसोटी आणि टी 20 मालिका खेळणार आहे.त्यानंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यात टीम इंडिया टेस्ट सीरिजमध्ये 2 हात करणार आहे. तर इंग्लंड वर्षाअखेरीस टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि वनडे मालिकेत आमनेसामने असणार आहे. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी पुढील काही महिने क्रिकेटची मेजवाणी असणार आहे.

8 महिन्यात 20 टी20आय सामने

दरम्यान टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर येत्या 8 महिन्यांमध्ये एकूण 5 टी 20 मालिकांमध्ये 20 सामने खेळणार आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 5, श्रीलंका आणि बांग्लादेश विरुद्ध 3-3, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 आणि इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक

टी 20 मालिका

पहिला सामना, 8 नोव्हेंबर, हॉलीवुडबेट्स किंग्समीड स्टेडियम
दुसरा सामना, 10 नोव्हेंबर, दफाबेट सेंट जॉर्ज पार्क
तिसरा सामना, 13 नोव्हेंबर, सुपरस्पोर्ट पार्क
चौथा सामना, 15 नोव्हेंबर, डीपी वर्ल्ड वांडरर्स