केपटाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. मालिकेतील पहिलाच सामना हा रद्द झाल्याने आता सीरिज जिंकण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा स्टार बॉलर अजूनही दक्षिण आफ्रिकेत पोहचलेला नाही. दीपक चाहर याचा टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आलेली आहे. मात्र दीपक अजून दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेला नाही. कौटुंबिक कारणामुळे दीपक हा दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियासोबत गेला नाही. दीपक ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यातूनही बाहेर पडला होता. दीपकने टीम मॅनजमेंटकडून सुट्टी मागितली होती. तर आता दीपक दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
“दीपक अजूनही डरबनमध्ये पोहचलेला नाही. कारण दीपकच्या घरातील सदस्याला रुग्णालयात दाखल केललें आहे. अशा गंभीर स्थितीत कुटुंबियांसह राहण्यासाठी दीपकने सुट्टी मागितली होती. दीपक येत्या काही दिवसात कुटुंबातील रुग्णाच्या प्रकृतीनुसार टीममध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत सांगणार आहे”,अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. तसेच जोवर दीपकच्या घरच्या सदस्याची प्कृती स्थिर होत नाही, तोवर आम्ही त्याला जबरदस्ती करणार नाहीत. तसेच त्याला या मालिकेतून माघार घ्यायची असेल, तर तोही पर्याय उपलब्ध आहे, असंही बीसीसीआयने म्हटलंय.
दीपक चाहरच्या वडिलांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून बिघडलेली आहे. वडिलांच्या आरोग्यामुळे दीपकने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यातून माघार घेतली होती. दीपकने दुखापतीनंतर टीम इंडियात कमबॅक केलं होतं. दीपकमुळे टीम इंडिया अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत पूर्णपणे बॅलन्स झाली होती. मात्र आता दीपकचे सीरिजमधून बाहेर पडण्याच्या संकेतामुळे टीम इंडियासाठी झटका समजला जात आहे.
दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.