SA vs IND | टीम इंडियाला झटका, मॅचविनर बॉलर आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतून आऊट!

| Updated on: Dec 14, 2023 | 6:57 PM

South Africa vs India Test Series | टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सांगता कसोटी मालिकेने करणार आहे. मात्र या कसोटी मालिकेच्या काही दिवसांआधी टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.

SA vs IND | टीम इंडियाला झटका, मॅचविनर बॉलर आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतून आऊट!
Follow us on

मुंबई | सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर उभयसंघात एकदिवसीय आणि कसोटी मालिका पार पडणार आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सांगता ही कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी हा दुखापतीच्या कचाट्यात सापडलाय. शमीने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीची निवड करण्यात आली. मात्र बीसीसीआयने तेव्हाच शमी फिटनेस टेस्ट पास झालाच, तरत उपलब्ध असेल असं स्पष्ट केलं होतं. मात्र शमीला झालेली दुखापत अपेक्षेनुसार बरी झालेली नाही. त्यामुळे शमीला कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागू शकतं.

शमीला घोट्याच्या दुखापतीचा त्रास आहे. त्यातून तो अजून सावरलेला नाही. कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी शमी दुखापतीतून सावरण्याची चिन्हं नाहीत. मात्र याबाबतीत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही. जर शमी मालिकेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये शार्दुल ठाकुर याला संधी मिळू शकते.

शमी दुखापतीच्या जाळ्यात

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी (फिटनेसवर अवलंबून) आणि प्रसीध कृष्णा.

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 26 ते 30 डिसेंबर, सेंचुरियन.

दूसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, केपटाउन.