दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी दुसरा टी 20I सामना ‘करो या मरो’ असा आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसर्या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. तर पाकिस्तानसमोर मालिकेतील आव्हान राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दुसर्या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते. दुसऱ्या सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हेनरिक क्लासेन हा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहेत. तर मोहम्मद रिझवान याच्याकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. उभयसंघातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन येथे करण्यात आलं आहे. हा सामना शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 9 वाजता टॉस होईल. सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर सामना पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिकेची मालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी
“Top Level Mindset”💭
David Miller reveals a few key aspects needed to overcome the various mental and physical hurdles of top level international cricket, ahead of the remaining KFC T20i’s against Pakistan.🏏🇿🇦🇵🇰#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/M9ygL0LFEY
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 12, 2024
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी दुसर्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या सरावाचा व्हीडिओ अधिकृत एक्स या सोशल मिडिया हँडलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
पाकिस्तान टीम: मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, सैम अयुब, उस्मान खान, तय्यब ताहिर, शाहीन आफ्रिदी, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, सुफियान मुकीम, हारिस रौफ, अबरार अहमद, सलमान आगा, ओमेर युसूफ, जहांदद खान आणि मोहम्मद हसनैन.
दक्षिण आफ्रिका टीम : हेनरिक क्लासेन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, मॅथ्यू ब्रेट्झके, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, अँडिले सिमेलेन, न्काबायोम्झी पीटर, क्वेना माफाका, ओटनील बार्टमन, दयान गॅलिम्सी, ताब्रायझम पॅट्रिक क्रुगर आणि रायन रिकेल्टन.