दक्षिण आफ्रिकेने न्यूलँडस केपटाऊनमध्ये झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह पाकिस्तानला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने सामन्यातील तिसऱ्या डावात मोठा कारनामा केला. कगिसो रबाडाचा यासह दक्षिण आफ्रिकेच्या टॉप 5 गोलंदाजांच्या यादीत समावेश झाला. कगिसो रबाडाने नक्की काय केलंय? जाणून घेऊयात.
कगिसो रबाडाने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातील तिसऱ्या डावात एकूण 3 विकेट्स घेतल्या. रबाडाने दुसरी विकेट घेतली आणि खास विक्रम आपल्या नावे केला. रबाडा न्यूलँड्समध्ये 50 विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज ठरला. न्यूलँड्समध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम माजी गोलंदाज डेल स्टेन याच्या नावावर आहे. डेल स्टेन याने 74 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी मखाया एंटिनीच्या नावावर 53 विकेट्स आहेत. फिलेंडरने 53 तर शॉन पॉलकने 51 विकेट्स मिळवल्या आहेत. रबाडाने या डावात एकूण 3 विकेट्स घेतल्या. रबाडाने तिसरी विकेट घेत शॉन पॉलकच्या 51 विकेट्सची बरोबरी केली.
दक्षिण आफ्रिकेचे पंच रत्न गोलंदाज
Another major milestone for Kagiso Rabada.#SAvPAK pic.twitter.com/0mNRiL8HJq
— Cricbuzz (@cricbuzz) January 6, 2025
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि क्वेना माफाका.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, आमेर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अब्बास