SA vs PAK 1st Odi : मंगळवारपासून वनडे सीरिजचा थरार, वर्ल्ड कपनंतर हा बॉलर खेळणार!

| Updated on: Dec 16, 2024 | 11:01 PM

South Africa vs Pakistan 1st Odi Live Streaming : दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला टी 20i मालिकेत 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

SA vs PAK 1st Odi : मंगळवारपासून वनडे सीरिजचा थरार, वर्ल्ड कपनंतर हा बॉलर खेळणार!
Temba Bavuma and Muhammad Rizwan sa vs pak odi series
Image Credit source: @TheRealPCB X Account
Follow us on

पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. पाकिस्तानला मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वात टी 20i मालिका गमवावी लागली. यजमान दक्षिण आफ्रिकेने सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर तिसरा आणि अंतिम सामना हा पाऊस आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची विजयी हॅटट्रिक हुकली तसेच पाकिस्तानला मालिकेतील विजयी शेवट करता आला नाही. त्यानंतर आता उभयसंघात 17 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांसाठी आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची धुरा आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजता टॉस करण्यात येणार आहे. सामना बोलँड पार्क, पार्ल येथे आयोजित करण्यात आला आहे. सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल. तर टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवच्या चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

कगिसो रबाडाकडे साऱ्यांचं लक्ष

दरम्यान या सलामीच्या सामन्यात कगिसो रबाडा याला संधी मिळणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. कगिसोने त्याचा अखेरचा वनडे सामना हा वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत खेळला होता. वनडे वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर रबाडा वनडे क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे आता रबाडाच्या कमबॅककडे साऱ्यांचं लक्ष आहे.

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजसाठी सज्ज

पाकिस्तान संघ : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, कामरान गुलाम, उस्मान खान, सलमान आगा, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद, मोहम्मद हसनैन, तय्यब ताहिर आणि सुफियान मुकीम.

दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, रायन रिकेल्टन, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडीले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, केशव महाराज, ओबरायसी शमी बार्टमन आणि क्वेना माफाका.