SA vs PAK : दक्षिण अफ्रिका मालिकेतील शेवटचा वनडे सामना ‘पिंक’ जर्सीसह खेळणार, कारण की…

| Updated on: Dec 21, 2024 | 4:01 PM

पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकून पाकिस्तानने मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे. असं असताना दक्षिण अफ्रिका पिंक जर्सीसह खेळणार असल्याने चर्चेत आला आहे. नेमकं कारण काय ते जाणून घ्या

SA vs PAK : दक्षिण अफ्रिका मालिकेतील शेवटचा वनडे सामना पिंक जर्सीसह खेळणार, कारण की...
Follow us on

पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने पाकिस्तानने जिंकले असून मालिका खिशात टाकली आहे. टी20 मालिकेनंतर पाकिस्तानने वनडे मालिकाही ताब्यात घेतली आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला तरी मालिका पाकिस्तानच्या खिशात असणार आहे. पण तिसरा वनडे सामना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कारण दक्षिण अफ्रिका हा वनडे सामना पिंक जर्सीसह खेळणार आहे. वनडे आणि टी20 सामने दक्षिण अफ्रिकेने अनेकदा पिंक जर्सीसह खेळले आहेत. यावेळेसही खास उद्देशाने पिंक जर्सी परिधान करून दक्षिण अफ्रिका मैदानात उतरणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये तिसऱ्या वनडे सामन्याची चर्चा रंगली आहे. नेमकं काय झालं की तिसरा वनडे सामना पिंक जर्सी परिधान करून खेळत आहेत.

22 डिसेंबरला जोहान्सबर्गमधील डीपी वर्ल्ड वाँडर्रस स्टेडियममध्ये तिसरा वनडे सामना असणार आहे. दक्षिण अफ्रिकेतील वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होणार आहे. यावेळी संपूर्ण मैदान हे गुलाबी रंगाने सजलेलं दिसणार आहे. त्याचं कारण म्हणजे दक्षिण अफ्रिका स्तनाच्या कर्करोगासंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी मैदानात उतरतील. त्यामुळे पिंक जर्सीसह सामना खेळला जाणार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण आफ्रिका संघ: टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, ओटनील बार्टमन, तबरेझ शम्सी, केशव महाराज, केशव महाराज मिलर, टेंबा बावुमा, क्वेना माफाका.

पाकिस्तान संघ: सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), कामरान गुलाम, सलमान आगा, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद, उस्मान खान, तय्यब ताहिर, मोहम्मद हसनैन, सुफियान मुकीम.