दक्षिण आफ्रिकने मायदेशातील कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकने पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशीच श्रीलंकेवर 233 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला विजयासाठी 516 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला79.4 ओव्हरमध्ये 282 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. दोन्ही डावात मिळून एकूण 11 (7+4) विकेट्स घेणारा मार्को यान्सेन हा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. तसेच दक्षिण आफ्रिकेचा हा धावांबाबत दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने याआधी 2017 साली श्रीलंकेवर 282 धावांनी विजय मिळवला होता.
सामन्यात काय झालं?
श्रीलंकेने टॉस जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेकला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 49.4 ओव्हगरमध्ये ऑलआऊट 191 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कॅप्टन टेम्बा बावुमा याने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि लहीरु कुमारा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र श्रीलंकेचा डब्बा गूल झाला. मार्को यान्सेन याने श्रीलंकेची कंबरडं मोडलं. मार्को यान्सने याने 7 विकेट्स घेत श्रीलंकेला 13.5 ओव्हरमध्ये 42 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 149 धावांनी मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टब्स आणि कॅप्टन टेम्बा बावुमा या दोघांनी शतकी खेळी साकारली. स्टब्सने 122 आणि तर बावुमाने 113 धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव 100.4 षटकांमध्ये 5 बाद 366 धावांवर घोषित केला. परिणामी श्रीलंकेला 516 धावांचं डोंगराएवढं आव्हान मिळालं. मात्र श्रीलंकेचा डाव हा 79.4 षटकांमध्ये 282 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात मार्को यान्सेन यानेच सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकनेने यासह 233 धावांनी हा सामना जिंकला.
दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सर्वात मोठा विजय
The Proteas wrap up a handsome win in Durban to take 1️⃣-0️⃣ lead in the two-Test series 🏏
📝 #SAvSL: https://t.co/dVkUTYXu2p #WTC25 pic.twitter.com/VkUfBjYtOY
— ICC (@ICC) November 30, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि कागिसो रबाडा.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंदिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो आणि विश्व फर्नांडो.