यजमान दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 109 धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात श्रीलंकेला व्हाईटवॉश केला आहे. दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेन पीटरसन ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. त्याने या सामन्यात 7 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 358 धावांपर्यंत मजल मारली. रायन रिकेल्टन आणि काइल वेरेन या दोघांनी शतकी खेळी केली. रिकेल्टन याने 11 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. तर वेरेन 105 धावांवर नाबाद परतला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने 78 धावांची निर्णायक खेळी केली. श्रीलंकेने प्रत्युतरात पहिल्या डावात 328 धावा केल्या. श्रीलंकेसाठी पाथुम निसांका याने 11 चौकार आणि 1 सिक्ससह 89 धावांची खेळी केली. कामिंदु मेंडीस याने 48 धावा केल्या. तर अनुभवी अँजलो मॅथ्युजने 44 धावा केल्या. इतर फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली, मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 30 धावांची आघाडी मिळाली.
दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या डावात टेम्बा बावुमा आणि एडन मारक्रम या दोघांनी अर्ध शतकी खेळी केली. बावुमाने 66 तर मार्करमने 55 धावा केल्या. तर इतरांनीही छोटेखानी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे दुसऱ्या डावात 317 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 348 धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकेने जोरदार प्रतिकार केला. मात्र निवडक फलंदाजांनीच खेळ दाखवला. श्रीलंकेसाठी दुसऱ्या डावात कॅप्टन धनंजया डीसिल्वा याने 50 धावा केल्या. कुसल मेंडीसने 46 धावा केल्या. इतरांनीही खेळ दाखवला, मात्र तो विजयासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे श्रीलंका विजयापासून 109 धावांनी दूर राहिली. श्रीलंकेचा दुसरा डाव हा 238 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात केशव महाराज याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आणि इतरांनीही चांगली साथ दिली.
दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
South Africa seal a 2-0 whitewash against Sri Lanka after a closely-contested win in Gqeberha 🙌#WTC25 | 📝 #SAvSL: https://t.co/grtLlEan8h pic.twitter.com/Y0iM1CUcH4
— ICC (@ICC) December 9, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि डेन पॅटरसन.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो, असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमार.