नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील चौथा सामना हा शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका आमनेसामने होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 102 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका टीमने विजयासाठी दिलेल्या 429 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला 44.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 326 धावाच करता आल्या. श्रीलंकेने 429 धावांचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र श्रीलंकेचे प्रयत्न अपुरे ठरले. श्रीलंकेला 102 धावांनी पराभव झाल्याने मोठा फटका बसला. कारण श्रीलंकेचा पराभवासह नेट रनरेटही बिघडला. आता त्यानंतर श्रीलंकेला आणखी एक मोठा फटका बसला आहे. आयसीसीने श्रीलंकेवर मोठी कारवाई केली आहे.
आयसीसी श्रीलंकेवर स्लो ओव्हर रेटमुळे दंडात्मक कारवाई केली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, ठराविक वेळेत 50 षटकांचा खेळ पूर्ण व्हायला हवा. मात्र श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध बॉलिंग करताना निर्धारित वेळेत 50 ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. कॅप्टन दासुन शनाका याच्या नेतृत्वात श्रीलंकाने निर्धारित वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे आयसीसीने श्रीलंकेवर ही कारवाई केली आहे. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी हा कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे आता श्रीलंकेला एका सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के इतकी रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर स्लो ओव्हर रेटसाठी आयसीसीच्या 2.22 या आचार संहितेनुसार कारवाई केली जाते. 2.22 या आचार संहितेनुसार एक ओव्हर निर्धारित वेळेत न टाकल्यास सामन्याच्या मानधनाचा 5 टक्के भाग हा दंड म्हणून द्यावा लागतो. इथे श्रीलंकेने 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे एकूण मानधनाच्या 10 टक्के रक्कम ही दंड स्वरुपात द्यावी लागणार आहे. तसेच कॅप्टन दासून शनाका याने त्याच्याकडून झालेली चूक स्वीकारली आहे.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कगिसो रबाडा.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेल्लालागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका आणि कसून राजिथा.