मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथा सामना चालू असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका सुरू होती. दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवत इंडिज संघाचा 2-0 ने पराभव करत व्हाईटवॉश दिला आहे. आफ्रिकेने विजय मिळवल्यावर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मुलाच्या शतकानंतर त्याच्या वडिलांचा आनंद गगनात मावत नसलेला दिसला. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार आहे.
दुसऱ्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमाने दुसऱ्या डावामध्ये 172 धावांची दमदार खेळी केली. जेव्हा टेम्बा बावुमाने शतक केलं त्यावेळी त्यानेही सेलिब्रेशन केलंच तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्याच्या वडिलांना झालेला होता. मैदानावर सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या त्याच्या वडिलांनी खुर्चीवरून उठून टाळ्या वाजवत आपल्या पोराचा शतकाचं आनंद द्विगुणित केला.
Yessssss
There it is.
Temba Bavuma scores his 2nd test ? for #Proteas, at his home ground and on his debut series as test captain.
The bloody monkey is off his back now.
What a hundred.
Congratulations skipper. #SAvWI #BePartOfIt pic.twitter.com/rTwlkTf7AM— Tiisetso Malepa (@TiisetsoMalepa) March 10, 2023
दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 320 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाला 251 धावांवर गुडाळलं. त्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार टेम्बाच्या 172 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर त्यांनी 321 धावा केल्या. आधीच्या डावात आघाडी घेतलेल्या आफ्रिकेन आता परत एकदा 321 धावा केल्या होत्या मात्र वेस्ट इंडिज संघचा डाव 106 धावांवरच आटोपला.
दरम्यान, पहिल्या कसोटीमधील दोन्ही डावांमध्ये टेम्बाला खातं उघडता आलं नव्हतं. त्याच्या नावावर नकोसा रेकॉर्डही झाला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने शतकच नाहीतर 172 धावा करत संघाला फ्रंटफुटवर आणलं. संघाने विजय मिळवला खरा पण बावुमाच्या वडिलांचा व्हिडीओ सर्वांची मन जिंकत आहे.
टेम्बा बावुमाने सेंच्युरियन मधील कसोटी सामन्यामध्ये दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण तीन बॉल खेळले. कसोटी सामन्यात कर्णधाराने खेळलेले हे सर्वात कमी बॉल ठरले होते. पहिल्या डावात दोन बॉलमध्येच बाद झाला होा आणि दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर बाद म्हणजे यातील एकच बॉल त्याने निर्धाव खेळला आणि त्यावरही त्याला रन काढता आला नाही.