IND vs NZ | विराटने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केल्यानंतर सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

| Updated on: Nov 15, 2023 | 6:37 PM

Sachin Tendulkar Reaction On Virat Kohli | विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याच्या होम ग्राउंड अर्थात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने आपला विश्व विक्रम मोडल्यानंतर सचिनने काय प्रतिक्रिया दिली जाणून घ्या.

IND vs NZ | विराटने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केल्यानंतर सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
Follow us on

मुंबई | टीम इंडियाच्या विराट कोहली याने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध कारनामा केला आहे. विराटने न्यूझीलंड विरुद्ध शतक ठोकलं. विराटच्या वनडे करिअरमधील हे 50 वं शतक झळकावलं. विराटने या शतकासह सचिनचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विश्व विक्रम मोडून काढला. विराटने 279 इनिंग्समध्ये शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं. तर सचिनला शतकांच्या अर्धशतकांसाठी 452 डाव खेळावे लागले होते. विराटचं या ऐतिहासिक शतकानंतर सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. क्रिकेट चाहते विराटला सोशल मीडियाद्वारे अभिनंदन करत आहे. विराटच्या या विक्रमी शतकानंतर दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकर याने प्रतिक्रिया दिली आहे. सचिन विराटबाबत काय म्हणाले, हे आपण जाणून घेऊयात.

सचिन काय म्हणाला?

विराटच्या या ऐतिहासिक शतकानंतर सचिनने ड्रेसिंग रुममधील पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. सचिनने सोशल मीडियावर पोस्ट करत हा किस्सा सांगितला आहे. “जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमध्ये भेटलो होतो, तेव्हा तुम्ही माझे चरण स्पर्श केलं होतं.यावरुन सहकाऱ्यांनी तुझी चेष्टा केली. मी त्या दिवशी हसू आवरु शकलो नाही. मात्र तुम्ही खेळाच्या आणि कौशल्याच्या जोरावर माझ्या मनात घर केलं”, असं सचिनने म्हटलं.

“मी फार आनंदी आहे की तो युवा आता एक ‘विराट’ खेळाडू झाला आहे. मला यापेक्षा जास्त आनंद नाही होऊ शकत की एका भारतीयाने माझा विक्रम मोडला आणि तोही वर्ल्ड कप सेमी फायनलसारख्या मोठ्या मंचावर.”, असंही सचिनने म्हटलं.

सचिनचं विराटसाठी खास ट्विट


न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.