आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात 36 धावांचा विक्रम पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळाली आहे. युवराज सिंगने आयसीसी टी20 वर्ल्डकप 2007 स्पर्धेत ही कमाल करून दाखवली होती. यात इंग्लंडच्या स्टूअर्ट ब्रॉडला सलग 6 षटकार मारून विक्रम रचला होता. त्याची चर्चा वर्षानुवर्षे होत आहे. आताही त्याची ही फटकेबाजी एक डोळ्यासमोर गेल्याशिवाय राहात नाही. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2021 मध्ये कायरन पोलार्ड आणि 2024 मध्ये निकोलस पूरन आणि दीपेंद्र सिंह ऐरी 36 धावांची फलंदाजी केली होती. आता समोआच्या फलंदाजाने अशीच कामगिरी करत युवराज सिंगसह इतरांचा विक्रम मोडीत काढला आहे. समोआच्या डेरियस विसरने एका षटकात 39 धावांचा विक्रम केला आहे.
आयसीसी मेन्स टी20 वर्ल्डकप सब रिजनल ईस्ट एशिया पॅसेफिक पात्रता फेरीच्या सामन्यात समोआ आणि वानुआतू समोरासमोर आले होते. नाणेफेकीचा कौल समोआच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 12 षटकात 5 गडी बाद 61 अशी स्थिती होती. डेरिअल विसर आणि फेरेटी सुलुलोटो ही जोडी मैदानात होती. या जोडीने 103 धावांची भागीदारी केली. तर डेरिअस विसरने 62 चेंडूत 132 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि 14 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 212.90 चा होता.
🚨WORLD RECORD CREATED IN MEN’S T20 LEVEL 1 OVER 39 RUNS
Darius Visser scored 39 runs in match between Samoa Vs Vanuatu
(🎥 – ICC)#T20 #T20WorldCup #records #ICC #CricketUpdate #cricketnews pic.twitter.com/sXiyrlxjtE— SportsOnX (@SportzOnX) August 20, 2024
15वं षटक टाकण्यासाठी नलिन निपिको आला आणि त्याची डेरिअर विसरने धुलाई केली. पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले. त्यानंतर एक चेंडू नो टाकला. पुन्हा टाकलेल्या चौथ्या चेंडूवर षटकार मारला. पाचवा चेंडू निर्धाव टाकला. सहावा चेंडू नो टाकला. पुन्हा सहावा चेंडू टाकताना तीच चूक झाली आणि नो बॉलवर षटकार मारला. त्यामुळे सहावा चेंडू पुन्हा टाकण्याची वेळ आली. सहाव्या चेंडूवर विसरने पुन्हा एकदा उत्तुंग षटकार मारत 39 धावा बोर्डावर ठोकल्या. विसरने आपल्या खेळीने समोआला विजयी केलं. तसेच 2026 टी20 वर्ल्डकप पात्रता फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
वानुआतु (प्लेइंग इलेव्हन): नलिन निपिको, ज्युनियर काल्टापाऊ, अँड्र्यू मानसाले, रोनाल्ड तारी, वोमेजो वोटू, जोशुआ रसू (कर्णधार), टिम कटलर, क्लेमेंट टॉमी (विकेटकीपर), डॅरेन वोटू, विल्यमसिंग नालिसा, सिम्पसन ओबेद.
समोआ (प्लेइंग इलेव्हन): शॉन कॉटर, डॅनियल बर्गेस, सॉलोमन नॅश, डॅरियस व्हिसर, सौमानी तियाई, कालेब जसमत(कर्णधार), फेरेती सुलुलोटो, अफापेन इलाओआ(विकेटकीपर), डग्लस फिनाऊ, नोआ मीड, टिनेमोली मिसी