मुंबई : भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली. कधी संघात तर कधी संघाबाहेर अशा स्थितीत संजू सॅमसन असायचा. कधी कधी तर वाटेला फलंदाजीही यायची नाही. आली तर स्वस्तात बाद झाला की टीका व्हायची. अशा सर्व दिव्यातून जाऊनही संजू सॅमसनने काही मौन सोडलं नाही. तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्यात संजू सॅमसनला यश आलं. त्याच्या शतकी खेळीने टीकाकारांची तोंड काही काळासाठी का होईना बंद झाली आहेत. संजू सॅमसनचे चाहते त्याच्या शतकी खेळीने आनंदी झाले आहेत. असं सर्व सुरु असताना क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेच्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. कारण हर्षा भोगलेने संजू सॅमसनच्या करिअरसाठी विराट कोहलीला अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.
हर्षा भोगलेने लिहिलं आहे की, संजू सॅमसन तिथेच फलंदाजी करत तिथे करायला हवी. हर्षा भोगलने संजू सॅमसन खेळायला उतरलेल्या तिसऱ्या क्रमांकाबाबत सांगितलं आहे. मात्र या स्थानावर विराट कोहलीने जागा पक्की केली आहे. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते भडकले आहेत. विराट कोहलीच्या चाहत्यांनी हर्षा भोगलेच्या ट्वीटवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला.
Sanju Samson at the batting number that is his. 👏🏼👍🏽
— Harsha Bhogle (@bhogleharsha) December 21, 2023
ठीक आहे, पण त्या स्थानावर फलंदाजीसाठी येत असलेल्या खेळाडूची कामगिरी त्याच्यापेक्षा सर्वोत्तम आहे. त्यानंतर हर्षा भोगलेनेही सारवासारव करत स्पष्टीकरण दिलं आहे. “त्या पोझिशनमध्ये खेळणारा खेळाडू हा आतापर्यंतचा महान फलंदाज आहे. येथे मी संजू सॅमसनसाठी सर्वोत्तम असलेल्या नंबरबद्दल बोलत आहे. टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर कोणी फलंदाजी करावी हे मी सांगितलेले नाही. कारण जोपर्यंत विराट कोहली आहे तोपर्यंत तो नंबर त्याचाच आहे .”
The man who is batting there is one of the greatest there has ever been. I am talking about the number that is best for Sanju Samson, not who should be batting no 3 for India in ODI cricket permanently. Till Virat is around, that is his. https://t.co/R8FB6Tk28k
— Harsha Bhogle (@bhogleharsha) December 21, 2023
संजू सॅमसन वनडे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. त्याने 16 सामन्यांमध्ये 57 च्या सरासरीने 510 धावा केल्या. या काळात संजूने एक शतक आणि 3 अर्धशतकं ठोकली आहेत. संजूने या स्थानावर तिसऱ्यांदा फलंदाजी केली. त्यापैकी एका सामन्यात शतक ठोकलं. दुसरीकडे, विराट कोहलीने 225 सामन्यात या स्थानावर खेळताना 43 शतकांसह 61 च्या सरासरीने 12 हजार धावा केल्या आहेत.