संजू सॅमसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रीलंका आणि बांग्लादेश मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यात चांगली करता आली नव्हती. पण बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतकी खेळई केली. त्याच्या विक्रमी खेळीनंतर संजू सॅमसनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं असताना गेल्या काही वर्षांपासून मनात बरंच काही साठवून ठेवलेल्या संजू सॅमसनच्या वडिलांचा राग अखेर बाहेर आला आहे. त्यांनी भारताच्या तीन माजी दिग्गज कर्णधारांवर गंभीर आरोप केला आहे. खरं तर संजू सॅमसनने 2015 मध्ये टी20 मध्ये पदार्पण केलं होतं. पण चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. पण 2024 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात त्याची प्रतिक्षा संपली आणि त्याला संधी मिळाली. संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी मल्यालम चॅनेलशी बोलताना सांगितलं की, ‘तीन चार लोकांनी माझ्या मुलाच्या करिअरच्या 10 वर्षांचं वाटोळं केलं. धोनी, कोहली, रोहित आणि राहुल द्रविड सारख्या प्रशिक्षकामुळे त्याच्या करिअरची 10 वर्षे वाया गेली. त्याला जितकं मागे ढकललं तितकाच तो पुढे आला.’
‘श्रीकांत सांगितलं की संजूने कोणाच्या विरुद्ध शतक ठोकलं आहे. बांगलादेशविरुद्ध.. सर्व सांगत होते की तो एक महान खेळाडू आहे पण मी नाही बाघितलं. शतक तर शतक असतं. त्याच्याकडे राहुल आणि सचिनसारखा क्लासिकल गेम आहे, त्याचा तर सन्मान करा. मी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवचं आभार व्यक्त करतो. जर हे आले नसते तर त्याला पुन्हा संघातून बाहेर केलं असतं. माझ्या मुलाच्या शतकाचं श्रेय या दोघांना जातं.’, असं संजू सॅमसनच्या वडिलांनी पुढे सांगितलं.
U sure he didn’t mentioned anyones name? 🤣 pic.twitter.com/k9VRIO3emd
— Arjun (@Arjun16149912) November 12, 2024
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर रोहित शर्माने निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर संजू सॅमसनचा संघातील मार्ग मोकळा झाला. गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर विश्वास टाकला आणि ओपनिंगला संधी दिली. काही सामन्यात संजूला काही खास करता आलं नाही. पण त्यानंतर त्याने शतकी खेळी करून फॉर्म असल्याचं दाखवून दिलं. टी20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. पण पुन्हा एकदा दोन वेळा शून्यावर बाद झाल्याने टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.