बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संजू सॅमसनची एन्ट्री? नेमकं काय सुरु आहे? जाणून घ्या

| Updated on: Sep 25, 2024 | 6:03 PM

कानपूर कसोटीनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी मिळू शकते.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संजू सॅमसनची एन्ट्री? नेमकं काय सुरु आहे? जाणून घ्या
Follow us on

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने अपेक्षित कामगिरी केली. तशीच अपेक्षा दुसऱ्या कसोटी सामन्यातही आहे. असं असताना भारतीय संघ त्यानंतर टी20 मालिकेला सामोरं जाणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्याने ते या संघाचा भाग नसतील. त्याचबरोबर या मालिकेसाठी ऋषभ पंतला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी या मालिकेत संजू सॅमसनला संधी मिळू शकते. दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या चार डावात संजू सॅमसनने 196 धावा केल्या आहेत. तसेच संजू सॅमसन टी20 वर्ल्डकप, झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियात होता. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, इशान किशनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही संधी मिळणं कठीण आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला काही काळ वाट पाहावी लागेल. त्याला संघात जागा मिळवण्यासाठी 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान इराणी चषकात चांगली कामगिरी करावी लागेल. पण निवडकर्त्यांची पहिली पसंत संजू सॅसमनच असणार आहे.

संजू सॅमसन श्रीलंका दौऱ्यात पूर्णपणे फेल गेला होता. पण दुलीप ट्रॉफी त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली आहे. संजू सॅमसनला संधी मिळते पण त्यातही सातत्य नसल्याने क्रीडाप्रेमी नाराजी व्यक्त करतात. पण गेल्या काही दिवसांपासून संघाचा भाग आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऋषभ पंत असल्याने त्याला संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसावं लागलं होतं. पण त्यानंतर झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यात त्याला संघात स्थान मिळालं होतं. संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यात निवडीसाठी सामना असेल. इशान किशन गेल्या 10 महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. इशानने बुची बाबू आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक केलं आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि त्यानंतर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यामुळे शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनाही टी20 मालिकेतून आराम दिला जाऊ शकतो. त्यामुळे संजू सॅमसन ओपनिंगला येऊ शकतो. संजू सॅमसनसोबत साई सुदर्शनला संघात स्थान मिळू शकतं. त्यामुळे संजू सॅमसन आणि साई सुदर्शन ही जोडी ओपनिंग करताना दिसू शकते.