मुंबई : आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल संघाला मोठा धक्का बसलेला आहे. कारण संघाचा सर्वात मोठा हुकमी एक्का असलेला खेळाडू बाहेर झाला आहे. संजू सॅमसन याने टॉस हरल्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. राजस्थान रॉयल्स संघाने अनेक सामने या खेळाडूच्या जोरावर आपल्या पारड्यात झुकवले आहेत. मात्र आजच्या चेन्नईविरूद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये हा मॅचविनर उपलब्ध नसल्याने संघासाठी वाईट बातमी आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज ट्रेंड बोल्ट आहे. बोल्ट खेळणार नसल्याची माहिती संजू सॅमसने सांगितलं. छोट्याशा दुखापतीमुळे बोल्ट या मॅच मध्ये खेळणार नसल्याचा सॅमसन म्हणाला. मागील तीन सामन्यांमध्ये राजस्थान संघासाठी बोल्टने सातच्या इकॉनॉमीने पाच विकेट घेतल्या आहेत.
आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. आम्ही यंदाच्या मोसमाची सुरूवात सुरुवात चांगली केली असून ती कायम ठेवायची आहे. खूप दिवसांनी आम्ही चेपॉकवर खेळत असल्याचं, टॉस हरल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग