मुंबई : आयपीएल 2024 आधी मोठ्या उलथापालथी होत असल्याचं दिसत आहे. गुजरात संघाचा कर्णधार मुंबई इंडियन्स संघाने ट्रेड केला. हार्दिकसाठी मुंबई संघाने तब्बल 15 कोटी रूपये मोजले, त्यासोबतच संघातील ऑल राऊंडर खेळाडू असलेल्या कॅमरून ग्रीनला त्यांनी आरसीबीला दिलं. अशातच सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने राजस्थानचा कर्णधार असलेल्या संजू सॅमसन याला कॅप्टन्सीसाठी ऑफर केल्याचा दावा केला जात होता. महत्त्वाचं म्हणजे याबाबत अश्विनच्या नावाचा वापर करत त्यांनी हा दावा केलेला. मात्र यावर स्वत: अश्विनने खुलासा केला आहे.
एका एक्स युजरने, सोशल मीडियावर रवी अश्विनने आपल्या यू ट्यूब चॅनेलवर संजू सॅमसन याला सीएसकेच्या कर्णधारपदासाठी विचारलं होतं. मात्र संजूने त्यासाठी नकार दिला असला तरी भविष्यात तो सीएसकेकडे जाण्याची दाट शक्यता असल्याचं सांगितलं. हार्दिक पंड्यानंतर आणखी एक कर्णधार आता ट्रेड होणार अशा चर्चा सोशल माध्यमांवर होत आहेत. या चर्चा जोर धरू लागल्यावर अश्विनने यावर खुलासा केला आहे.
आर. अश्विन याने ट्विट केलं असून, उगाच माझ्या नावाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवू नका, असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर ट्विट जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. आर. अश्विन आता राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असल्याने त्याच्या नावाने व्हायरल झालेलं वक्तव्य हे चाहत्यांना खरं वाटू लागलं होतं. मात्र यावर अश्विनने स्वत: खुलासा करत या चर्चांणा पूर्णविराम दिला आहे.
Ashwin on his YouTube channel – “Sanju Samson was approached by CSK as a captain which was nearly finalised. But it dint go through Sanju rejected their offer. Theres a definite possibility in future”. #SanjuSamson #IPL2024 #iplauction2024 pic.twitter.com/DnKZ1g0nu8
— Roshmi 🏏 (@CricketWithRosh) November 28, 2023
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून संजू सॅमसन याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नसल्याने चाहते निवड समितीवर नाराज आहेत. संजूसारख्या गुणवान खेळाडूला संघात जागा न दिल्याने अनेकदा बीसीसीआयवर काही माजी खेळाडूंनीही निशाणा साधला आहे. संजू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे.