संजू सॅमसनला पाच डावात केलेल्या तीन शतकांसाठी मिळालं मोठं बक्षीस, थेट कर्णधारपदाची माळ गळ्यात

| Updated on: Nov 20, 2024 | 4:36 PM

संजू सॅमसन सध्य जबरदस्त फॉर्मात आहे. बांग्लादेश दौऱ्यानंतर संजू सॅमसनचे तारे फिरले आहे. एका वर्षात 3 शतकं ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध एक आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन शतकं ठोकली आहेत. असं असताना संजू सॅमसनवर आता मोठी जबाबदारी पडली आहे.

संजू सॅमसनला पाच डावात केलेल्या तीन शतकांसाठी मिळालं मोठं बक्षीस, थेट कर्णधारपदाची माळ गळ्यात
Follow us on

भारतीय संघाचे या वर्षीचे टी20 क्रिकेटचे सर्व सामने सामने संपले आहेत. भारताने यंदा जबरदस्त कामगिरी केली आहे. 26 टी20 सामन्यापैकी 24 सामन्यात विजय मिळवला आहे. तर झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेने प्रत्येकी एका सामन्यात पराभूत केलं आहे. असं असताना या टी20 स्पर्धेच्या शेवटच्या काही सामन्यात संजू सॅमसनला सूर गवसला आहे. मागच्या पाच डावात संजू सॅमसनने तीन शतकं ठोकली आहेत. त्यामुळे संजू सॅमसन जबरदस्त फॉर्मात असल्याचं अधोरेखित होतं. असं असताना संजू सॅमसनवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी संजू सॅमसनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. केरळ संघाने संजू सॅमसनला कर्णधारपद सोपवलं आहे. भारतीय संघ जानेवारीपर्यंत एकही टी20 सामना खेळणार नाही. त्यात सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी संघात संजूची निवड झालेली नाही. त्यामुळे संजू सॅमसन सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी उपलब्ध आहे. नुकत्याच खेळलेल्या रणजी स्पर्धेत संजू सॅमसन केरळकडून सचिन बेबीच्या नेतृत्त्वात खेळला होता. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. पण शेवटच्या सामन्यात शतक ठोकत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यात 4 पैकी दोन सामन्यात शतकी खेळी केली.

सैयद मुश्ताक अली स्पर्धा 23 नोव्हेंबरपासून आहे. या स्पर्धेतील केरळचा पहिला सामना हैदरामध्ये सर्व्हिसेज विरुद्ध होणार आहे. केरळचा संघ ग्रुप ई मध्ये आहे. या ग्रुपमध्ये गोवा, मुंबई, महाराष्ट्र, सर्व्हिसेज, नागालँड आणि आंध्र प्रदेश यांच्याशी सामना होणार आहे. केरळ संघाचे सर्व सामना जिमखाना ग्राउंड आणि राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहेत.

सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी केरळचा संघ: संजू सॅमसन (कर्णार), सचिन बेबी, रोहन कुन्नुमल, जलज सक्सेना, विष्णु विनोद, मोहम्मद अज़हरुद्दीन, बासिल थम्पी, एस निजार, अब्दुल बासिथ, ए स्कारिया, अजनास ईएम, सिजोमन जोसेफ, मिधुन एस, वैसाख चंद्रन, विनोद कुमार सीवी, बासिल एनपी, शराफुद्दीन एनएम, निधिश एमडी.