मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगा सारा तेंडुलकर कायम चर्चेत असते. सारा तेंडुलकर आणि युवा खेळाडू शुबमन गिल या दोघांच्या अफेरची चर्चा कायम होताना दिसते. सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान या दोघींसोबत शुबमन गिल याचं नाव जोडलं जातं. मात्र यावर अधिकृत अशी कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. अशातच सारा तेंडुलकर हिने आपल्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत.
सारा तेंडुलकर सध्या केनियामध्ये असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. साराने पाच दिवसांमागे केनियामधील काही फोटो शेअर केले होते. मात्र आज तिने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत.
सारा तेंडुलकर केनियामधील मसाई येथे असून साराने दोन फोटो शेअर केले आहेत त्यातील एक फोटोमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. या फोटोला कॅप्शनमध्ये, मीफोटो पोस्ट करायचा का नाही याचा मी विचार करत होते पण मसाईला येण्याचा योग्य निर्णय घेतला असल्याचं सारा तेंडुलकर हिने म्हटलं आहे.
साराने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिचं लोकेशन मसई मारा, केनिया असं दिसत याच संदर्भावरून आहे. त्यामुळे केनियाला सुट्ट्या घालवण्याचा निर्णय योग्य घेतला असल्याचं दिसत आहे. साराचे हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
साराच्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी शुबमन गिल याला आता साराला विसरण्याचा सल्ला दिला आहे. सारा तेंडुलकरने याआधी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र हे दोन फोटो आता शेअर केल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.