मुंबई : सारा तेंडुलकर या ना त्या कारणाने कायम लाईमलाईटमध्ये असते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी असली तरी तिचा स्वत:चा वर्ग आहे. सारा तेंडुलकरचे अनेक चाहते असून याचा अंदाज तिच्या फॉलोअर्सवरून दिसून येतो. पण सारा तेंडुलकर कोणाला फॉलो करते याबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. साराच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक वावड्या उठतात. पण त्यात काही तथ्य नसल्याने त्या तितक्याच जोरकसपणे आपटतातही. सारा तेंडुलकरला इंस्टाग्रामवर 59 लाख लोकं फॉलो करतात. पण सारा तेंडुलकर फक्त 669 लोकांना फॉलो करते. या लिस्टमध्ये अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सुरेश रैना यांना फॉलो करते. तसेच या लिस्टमध्ये फक्त दोन क्रिकेटर्सचा पत्नींचा समावेश आहे.
सारा तेंडुलकर फिरकीपटू आर अश्विन याची पत्नी प्रीति नारायण आणि अष्टपैलू कृणाल पांड्या याची पत्नी पंखुरी शर्मा यांना फॉलो करते. तर शुबमन गिलच्या जवळच्या व्यक्तीलाही सारा फॉलो करते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बहीण आहे. शुबमनची बहीण शाहनील हीला ती फॉलो करते. काही दिवसांपूर्वी हे दोघेजण एकत्र दिसले होते.
सारा तेंडुलकर हीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात पिंक साडी आणि हेवी ज्वेलरी घालून ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली होती. त्याखाली कमेंट्स देण्यासाठी चाहत्यांची चढाओढ लागली होती. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर डीप फेकच्या जाळ्यात अडकली होती. या फोटोत सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल एकत्र दिसले होते. पण हा फोटो बनावट असल्याचं नंतर समोर आलं होतं.
साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते की, “सोशल मीडिया हे आपल्यासाठी आनंद, दु:ख आणि दैनंदिन घडामोडी शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. परंतु तंत्रज्ञानाचा काही लोक चुकीचा वापर करत आहे. ही बाब खूपच चिंताजनक आहे..यामुळे इंटरनेटचे प्रामाणिकपणा आणि सत्यता हिरावून घेते.”