बीसीसीआयने बुधवारी 14 ऑगस्ट रोजी दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेसाठी 4 संघामधील खेळाडूंची नावं जाहीर केली. दुलीप ट्रॉफी स्पर्धेला येत्या 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील अखेरचा सामना हा 19 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील एकूण 4 संघ प्रत्येकी 3 सामने खेळणार आहेत. प्रत्येक सामना हा 4 दिवसांचा असणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा 5 सप्टेंबरला होणार आहे. सलामीच्या सामन्यात इंडिया ए विरुद्ध इंडिया बी आमनेसामने असणार आहेत. तर त्यानंतर 5 सप्टेंबरलाच दुसरा सामना ओयिजत करण्यात आला आहे. या दुसऱ्या सामन्यात इंडिया सी विरुद्ध इंडिया डी भिडणार आहेत. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सर्व सामने हे अनंतपूर आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहेत. याबाबतची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 2 सख्ख्या भावांची जोडी एकाच टीमकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईकर सरफराज खान आणि मुशीर खान हे दोघे टीम बीकडून खेळणार आबे. सरफराज आणि मुशीर या दोघांनी देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या आहेत. सरफराजला याच जोरावर टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलं होतं. तसेच मुशीर खान टीम इंडियाचं अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच सरफराज आणि मुशीर यांचे वडील नौशाद खान हे देखील माजी क्रिकेटपटू आहेत. नौशाद खान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यासह कांगा लीग स्पर्धेत खेळले आहेत.
सरफराजने 48 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 68.53 च्या सरासरीने 4 हजार 112 धावा केल्या आहेत. तर सरफराजचा भाऊ मुशीर खान याने 6 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 58 च्या सरासरीने 529 धावा केल्या आहेत. तसेच मुशीरने 7 विकेट्सही घेतल्या आहेत. दरम्यान टीम सीमध्ये रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि यशस्वी जयस्वाल या युवा आणि अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे.
दुलीप ट्रॉफीसाठी टीम बी: अभिमन्यु ईश्वरन (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, एन जगदीशन (विकेटकीपर) आणि मोहित अवस्थी.