…अखेर सरफराज खानपुढे झुकावं लागलं! इंग्लंडच्या दणक्यानंतर बीसीसीआय भानावर

| Updated on: Jan 29, 2024 | 5:21 PM

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही सरफराज खानल टीम इंडियात स्थान मिळणं कठीण झालं होतं. फिटनेसची कारणं देऊन अनेकदा टाळाटाळ झाली होतील. पण अखेर बीसीसीआयला सरफराज खानचा विचार करावा लागला आहे.

...अखेर सरफराज खानपुढे झुकावं लागलं! इंग्लंडच्या दणक्यानंतर बीसीसीआय भानावर
Follow us on

मुंबई : सरफराज खान हे नाव देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणारा हा खेळाडू मात्र टीम इंडियात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. वारंवार त्याच्या नावाचा विचार करावा असं माजी क्रिकेटपटू सांगत होतं. पण फिटनेस पाहता त्याला संघात स्थान मिळणं कठीण झालं होतं. फिटनेस लेव्हल आणि वजन पाहता त्याला संघात स्थान मिळत नसल्याची सांगण्यात येत होतं. पण इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात दणका दिल्यानंतर सरफराज खानची आठवण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरफराज खान टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत होता. अखेर बीसीसीआयने दुसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खानच्या नावाची घोषणा केली. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाहीत. त्यामुळे सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना भारतीय संघात स्थान मिळलं आहे. सरफराज खानला आता प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळतं की नाही हे पाहणं औत्सुक्याचं राहील.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराज खान याची बॅट चांगलीच तळपली आह. इंग्लंड लायन्सविरुद्ध इंडिया ए कडून खेळताना सरफराज खान याने 160 चेंडूत 161 धावांची वादळी खेळी केली होती. पहिल्या डावात 63 धावा केल्या होत्या. तर दक्षिण अफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया ए कडून खेळताना त्याने 63 चेंडूत शतक ठोकलं होतं. मात्र तरीही त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र आता त्याला नशिबाची साथ मिळाली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याची निवड झाली आहे. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळताच कसोटीत डेब्यू होणार आहे.

अहमदाबाद येथे 1 फेब्रुवारी 2024 पासून इंग्लंड लायन्स विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया ए संघात वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सारांश जैनची निवड करण्यात आली आहे. आवेश खान रणजी करंडक स्पर्धेत मध्य प्रदेश संघासोबत आहे. पण टीम इंडियाला गरज पडल्यास कसोटी संघात सामील होईल.

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.