Sarfaraz Khanची विस्फोटक खेळी, निर्णायक क्षणी झंझावाती अर्धशतक

| Updated on: Mar 08, 2024 | 2:22 PM

Sarfaraz Khan Fifty | मुंबईकर सरफराज खान याने टीम इंडियासाठी निर्णायक क्षणी झुंज देत झंझावाती अर्धशतकी खेळी केली. सरफराजने या खेळीत अनेक अफलातून फटके मारले.

Sarfaraz Khanची विस्फोटक खेळी, निर्णायक क्षणी झंझावाती अर्धशतक
Follow us on

धर्मशाला | टीम इंडियाने इंग्लडला पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात 218 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाने जोरदार सुरुवात केली. टीम इंडियाचा यशस्वी जयस्वाल याने 57 धावांची तडाखेदार खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या विकटेसाठी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी 171 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. मात्र दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर फासे पालटले. रोहित-शुबमन सेट जोडी आऊट झाली. रोहितने 103 आणि शुबमनने 110 धावा केल्या.

रोहित-शुबमन सेट जोडी झटपट आऊट झाल्याने आता सरफराज खान आणि डेब्यूटंट देवदत्त पडीक्कल या दोघांवर मदार होती. या दोघांनी सार्थपणे टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मुंबईकर सरफराज खान याने आक्रमक पद्धतीने आपल्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धं एकूण तिसरं अर्धशतक झळकावलं. सरफराज खान याने 81 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. सरफराजने 55 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 92.73 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.