IPL साठी धोक्याची घंटा, भारतीय खेळाडूंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न, बीसीसीआयही तयार?

| Updated on: Apr 14, 2023 | 5:54 PM

आयपीएल लीगचे चाहते जगातील प्रत्येक देशात आहेत. विविध देशातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. मात्र आता आयपीएलला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात रंगली आहे. जाणून घ्या..

IPL साठी धोक्याची घंटा, भारतीय खेळाडूंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न, बीसीसीआयही तयार?
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आतापर्यंत प्रत्येक संघाने आपले किमान 2-3 सामने खेळले आहेत. आतापर्यंत एकूण 17 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं आहे. यंदा जिओ सिनेमा एपमुळे एकूण 12 भाषांमध्ये क्रिकेट कॉमेंट्री ऐकायलाही मिळत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते आयपीएलकडे ओढले गेले आहेत. दरवर्षी आयपीएल पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आयपीएलला दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळतेय, हे सर्वश्रूत आहे. आयपीएलची प्रसिद्धी पाहता अनेक देशांमध्ये बीपीएल, पीएसल या आणि अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यावरुन आयपीएलच्या प्रसिद्धीचा आणि टी 20 क्रिकेटला मिळणारा वाढता प्रतिसाद दिसून येतो.

आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना आपल्यातील हुशारी दाखवण्याची संधी मिळाली. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंची आर्थिक स्थिती सुधारली. काही खेळाडूंना थेट टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. थोडक्यात काय तर आयपीएलने पैसा, प्रसिद्धी आणि संधी अशा सर्व गोष्टी उपलब्ध करुन दिलीय. आयपीएल जगातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध लीग आहे. मात्र या आयपीएलवर वाकडी नजर पडली आहे. आयपीएलला असलेलं सर्वात मोठ्या स्पर्धेचं स्टेटस हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरु झाल्यासं समोर आलं आहे. हे नक्की प्रकरण काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

सौदी अरेबिया मोठा डाव रचत आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी 20 स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्लान सौदी अरेबिया करक असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाने आमच्याकडे जगातील सर्वात श्रीमंत टी 20 लीगचं आयोजन करा, असा प्रस्ताव आयपीएल मालकांना दिल्याचं म्हटलं जात आहे. नियमांनुसार, भारतीय खेळाडूंना कोणत्याही परदेशी लीग स्पर्धेत सहभागी होता येत नाही. खेळाडूंना खेळायचं असेल, तर निवृत्ती घेऊनच खेळता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनिष पांडे.

द एजच्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबिया लीग बाबत जवळपास एक वर्षापासून चर्चा सुरु आहे. या लीग स्पर्धेसाठी आयसीसी आणि इतर संबंधित बोर्डाची परवानगी लागते. सौदी अरेबियाने गेल्या वर्षभरात क्रीडा क्षेत्रात भर दिला आहे.

सौदी अरेबिया सरकारने गोल्फमध्ये Liv Golf पासून सुरुवात केली होती. या शिवाय आता फुटबॉल आणि एफ 1 नंतर क्रिकेटकडे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सौदी अरेबिया क्रिकेटसाठी इच्छूक असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान आता सौदी अरेबियाचा जगातील सर्वात श्रीमंत टी 20 लीग स्पर्धेच्या प्रस्तावाचं काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.