SCO vs AUS : आयपीएलमध्ये विस्फोटक बॅटिंग, आता टी20I डेब्यू, जेक फ्रेझर-मॅकगर्क याला संधी

| Updated on: Sep 04, 2024 | 7:40 PM

Jake Fraser McGurk T20i Debut: ऑस्ट्रेलियाचा युवा विस्फोटक फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क याने स्कॉटलँड विरुद्ध पदार्पण केलं आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्क याच्याकडे डेव्हिड वॉर्नरचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं.

SCO vs AUS : आयपीएलमध्ये विस्फोटक बॅटिंग, आता टी20I डेब्यू, जेक फ्रेझर-मॅकगर्क याला संधी
Jake Fraser McGurk Australia
Image Credit source: Icc X account
Follow us on

स्कॉटलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20i मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्याचं आयोजन हे ग्रेंज क्रिकेट क्लब, एडिनबर्ग येथे करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँड विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये एका युवा खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आपल्या विस्फोटक बॅटिंगने प्रतिस्पर्धी संघांना घाम फोडला होता. जेक फ्रेझर-मॅकगर्क याला वनडेनंतर टी 20i टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचं टी 20 वर्ल्ड कप 2024 मोहिमेतील आव्हान हे सुपर 8 मध्ये संपुष्टात आलं.त्यानंतर डेव्हिड वॉर्नर याने टी 20i क्रिकेटला अलविदा केला. वॉर्नरचा उत्तराधिकारी म्हणून जेक फ्रेझर-मॅकगर्क याचं नाव आघाडीवर होतं. अखेर जेक फ्रेझर-मॅकगर्क याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्क याच्याकडून आता ऑस्ट्रेलियाला विस्फोटक बॅटिंगची अपेक्षा असणार आहे.

शॉन मार्शनंतर दुसराच खेळाडू

जेक फ्रेझर-मॅकगर्क हा आयपीएलच्या 17 व्या हंगामात दिल्ली कॅपिट्ल्स टीमकडून खेळला होता. जेक फ्रेझर-मॅकगर्क याने 9 सामन्यांमध्ये 234 च्या विस्फोटक स्ट्राईक रेटने 4 अर्धशतकांसह 36.67 च्या सरासरीने 330 धावा केल्या. जेकने आयपीएलआधी ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय पदार्पण केलं होतं. जेकने तोवर 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये 25.5 च्या सरासरीने 51 धावा केल्या होत्या. जेक आयपीएलनंतर टी20i डेब्यू करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसराच खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात आधी अशी कामगिरी शॉन मार्श याने केली होती.

जेक फ्रेझर-मॅकगर्क याचं टी20I पदार्पण

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, जोश इंग्लिस, मार्कस स्टोयनिस, टीम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, सीन एबॉट, जेवियर बार्टलेट, एडम झॅम्पा आणि रिले मेरेडिथ.

स्कॉटलँड प्लेइंग ईलेव्हन : रिची बेरिंगटन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, ओली हेयर्स, ब्रँडन मॅकमुलेन, मॅथ्यू क्रॉस, मायकल लीस्क, मार्क वॉट, जॅक जार्विस, चार्ली कॅसेल, जॅस्पर डेविडसन आणि ब्रॅड व्हील.