SCO vs AUS: हेड-मार्शचा झंझावात, ऑस्ट्रेलियाचा स्कॉटलँडवर 7 विकेट्सने धमाकेदार विजय

| Updated on: Sep 04, 2024 | 9:17 PM

Scotland vs Australia 1st T20I Match Result: ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडवर पहिल्या टी 20i सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

SCO vs AUS: हेड-मार्शचा झंझावात, ऑस्ट्रेलियाचा स्कॉटलँडवर 7 विकेट्सने धमाकेदार विजय
travis head and mitchell marsh
Follow us on

ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँड विरुद्ध विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी 20i सामन्यात स्कॉटलँडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. स्कॉटलँडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 9.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ट्रॅव्हिस हेड आणि कॅप्टन मिचेल मार्श या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सामना फिरवला. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. तर कॅप्टन मिचेलने त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

जॅक फ्रेजर मॅकगर्क पदार्पणातील सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 1 आऊट 0 अशी स्थिती झाली. त्यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी विस्फोटक बॅटिंग केली. मात्र यानंतर दोघेही एकाच ओव्हरमध्ये आऊट झाले. मिचेल मार्श याने 12 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. त्यानंतर हेडही आऊट झाला. हेडने 25 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 12 चौकारांच्या मदतीने 320 च्या स्ट्राईक रेटने 80 धावा ठोकल्या.

त्यानंतर जोश इंग्लिस आणि मार्क्स स्टोयनिस या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. इंग्लिसने 13 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 27 रन्स केल्या. तर स्टोयनिसने नाबाद 8 धावा केल्या. स्कॉटलँडकडून मार्क वॉटने 2 विकेट्स घेतल्या. तर ब्रँडन मॅकमुलेन याने 1 विकेट घेतली.

हेडचा झंझावात, ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात

स्कॉटलँड प्लेइंग ईलेव्हन : रिची बेरिंगटन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, ओली हेयर्स, ब्रँडन मॅकमुलेन, मॅथ्यू क्रॉस, मायकल लीस्क, मार्क वॉट, जॅक जार्विस, चार्ली कॅसेल, जॅस्पर डेविडसन आणि ब्रॅड व्हील.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, जोश इंग्लिस, मार्कस स्टोयनिस, टीम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, सीन एबॉट, झेवियर बार्टलेट, एडम झॅम्पा आणि रिले मेरेडिथ.