स्कॉटलँड क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाला पहिल्या टी 20I सामन्यात विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं आहे. स्कॉटलँडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. स्कॉटलँडकडून एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र काही फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. त्यामुळे स्कॉटलँडला ऑस्ट्रेलियासमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. आता स्कॉटलँड आपल्या घरच्या मैदानात या 155 धावांचा बचाव करत विजयी सुरुवात करणार? की ऑस्ट्रेलिया स्कॉटलँडचा धुव्वा उडवून विजयाचं खातं उघडणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
स्कॉटलँडसाठी जॉर्ज मुन्से याने सर्वाधिक धावा केल्या. मुन्सने 16 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 28 रन्स केल्या. मॅथ्यु क्रॉस याने 21 बॉलमध्ये 27 धावा जोडल्या. या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र दोघांपैकी एकालाही मोठी खेळी करता आला नाही. दोघांव्यतिरिक्त रिची बेरिंगटन, ब्रँडन मॅकमुलेन, मार्क वॉट आणि जॅक जार्विस या चौघांनी दुहेरी आकड्यापर्यंत मजल मारली. कॅप्टन रिची बेरिंगटनने 20 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. ब्रँडन मकमुलेनने 19 धावांचं योगदान दिलं. मार्क वॉटने 16 रन्स केल्या. तर जॅक जार्विस 10 धावा करुन माघारी परतला.
ब्रॅड व्हील आणि जॅस्पर डेविडसन ही जोडी नाबाद परतली. दोघांनी अनुक्रमे 8 आणि 3 अशा धावा केल्या. तर मायकल लीस्क याने 7 धावा जोडल्या. तर चार्ली कॅसेल याने 1 धाव जोडली. ऑस्ट्रेलियाकडून सीन एबोटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. एडम झॅम्पा आणि झेवियर बार्टलेट या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रिले मेरेडिथ आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
स्कॉटलँडच्या 9 बाद 154 धावा
We finish our innings on 1️⃣5️⃣4️⃣-9️⃣ 🏴#FollowScotland | #SCOvAUS pic.twitter.com/FgVzFZuEmM
— Cricket Scotland (@CricketScotland) September 4, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, जोश इंग्लिस, मार्कस स्टोयनिस, टीम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, सीन एबॉट, जेवियर बार्टलेट, एडम झॅम्पा आणि रिले मेरेडिथ.
स्कॉटलँड प्लेइंग ईलेव्हन : रिची बेरिंगटन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, ओली हेयर्स, ब्रँडन मॅकमुलेन, मॅथ्यू क्रॉस, मायकल लीस्क, मार्क वॉट, जॅक जार्विस, चार्ली कॅसेल, जॅस्पर डेविडसन आणि ब्रॅड व्हील.