7 षटकार-7 चौकार, Josh Inglisचं विस्फोटक शतक, सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक

| Updated on: Sep 06, 2024 | 9:06 PM

Josh Inglis Century: जोस इंग्लिस याने इतिहास रचला आहे. जोसने स्कॉटलँड विरुद्ध वेगवान शतक ठोकत सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

7 षटकार-7 चौकार, Josh Inglisचं विस्फोटक शतक, सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक
suryakumar Yadav and josh inglis
Image Credit source: ap and icc
Follow us on

स्कॉटलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एडीनबर्घ येथे दुसरा टी 20I सामना खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरलेला ट्रेव्हिस हेड दुसऱ्या टी 20I मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर आऊट झाला. तर दुसऱ्या बाजूला जोस इंग्लिसने इतिहास रचला. जोस इंग्लिस याने अवघ्या 43 बॉलमध्ये विस्फोटक शतक ठोकलं. जोसने या स्फोटक शतकासह अनेक रेकॉर्ड उध्वस्त केले. जोस ऑस्ट्रेलियासाठी वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच जोसने सूर्यकुमार यादव याला मागे टाकलं. तसेच इंग्लिसच्या या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला 190 पार मजल मारता आली.

स्कॉटलँड ब्रॅडली करी ऑस्ट्रेलियाच्या डावातील 18 वी ओव्हर टाकायला आला. जोस इंग्लिस याने या ओव्हरमधील दुसर्‍या बॉलवर सिक्स ठोकून शतक पूर्ण केलं. जोसच्या टी 20I कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. जोसने या खेळीसह अनेकांना मागे टाकलं. इतकंच नाही तर जोसने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आणि ऑस्ट्रेलियाकडून वेगवान टी 20I शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. जोसने याआधी 23 नोव्हेंबर 2023 रोजी टीम इंडिया विरुद्ध विशाखापट्टणम येथे 47 चेंडूत शतक केलं होतं. तर आता इंग्लिसने 4 बॉलआधी ही कामगिरी केली आहे.

सूर्याचा रेकॉर्ड ब्रेक

ऑस्ट्रेलियाकडून एरॉन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनीही 47 चेंडूत शतक केलं आहे. फिंचने इंग्लंड विरुद्ध 29 ऑगस्ट 2013 रोजी 47 चेंडूत शतक केलं होतं. तर ग्लेन मॅक्सवेल याने गुवाहाटीत टीम इंडिया विरुद्ध 28 नोव्हेंबर 2023 रोजी 47 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. दरम्यान जोसने 43 बॉलमध्ये शतक करत सूर्यकुमार यादव याला मागे टाकलं. सूर्याने श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटीत 7 जानेवारी 2023 रोजी 45 चेंडूत शतक ठोकलं होतं.

जोस इंग्लिसचं शतक

स्कॉटलँड प्लेइंग ईलेव्हन : रिची बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, चार्ली टीयर (विकेटकीपर), मायकेल लीस्क, मार्क वॅट, ख्रिस ग्रीव्हज, क्रिस्टोफर सोल, ब्रॅड व्हील आणि ब्रॅडली करी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), आरोन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट आणि ॲडम झाम्पा.