SCO vs AUS : स्कॉटलँड-ऑस्ट्रेलिया टी 20I मालिका 4 ऑगस्टपासून, जाणून घ्या

| Updated on: Sep 03, 2024 | 10:30 PM

Scotland vs Australia 1st T20 2024: स्कॉटलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20i मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. जाणून घ्या सर्वकाही.

SCO vs AUS : स्कॉटलँड-ऑस्ट्रेलिया टी 20I मालिका 4 ऑगस्टपासून, जाणून घ्या
sco vs aus
Follow us on

स्कॉटलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20I मालिकेला बुधवार 4 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघातील पहिला सामना हा एडिनबर्ग येथील ग्रेंज क्रिकेट क्लबमध्ये खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि स्कटॉलँड या दोन्ही संघांचा टी 20I वर्ल्ड कपनंतरचा हा पहिलाच सामना असणार आहे. मालिकेच्या अनेक दिवसांआधी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर रिची बेरिंग्टन याच्याकडे स्कॉटलँडच्या धुरा सोपवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाने अखेरचा टी 20I सामना टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. तर स्कॉटलँडने अखेरचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20I वर्ल्ड कपमध्येच खेळला होता. स्कॉटलँडला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता दोन्ही संघांचं या मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा मानस असणार आहे. स्कॉटलँडचा ऑस्ट्रेलियाला आपल्या घरात पराभूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना धमाकेदार कामगिरी करावी लागेल. उभयसंघातील मालिकेतील सामने भारतात टीव्हीवर पाहता येणार नाहीत. मात्र मोबाईलवर फॅनकोड एपवर सामने पाहता येणार आहेत.

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 4 सप्टेंबर

दुसरा सामना, शुक्रवार 6 सप्टेंबर

तिसरा सामना, शनिवार 7 सप्टेंबर

स्कॉटलँड टी 20i मालिकेसाठी सज्ज

टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, रिले मेरेडिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी स्कॉटलँड टीम : रिची बेरिंग्टन (कॅप्टन), चार्ली कॅसल, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, जॅस्पर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्ह्ज, ओली हेअर्स, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, साफयान शरीफ, ख्रिस सोल, चार्ली टीयर, मार्क वॅट आणि ब्रॅडली व्हील.