टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला.रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहास रचला. मेन्सनंतर आता वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये एका वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. या 10 संघांना 5-5 करुन 2 गटात विभागण्यात आलं आहे. स्पर्धेचं आयोजन हे यूएईत करण्यात आलं आहे. आता या वर्ल्ड कपसाठी सहाव्या टीमने आपल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या टीमने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
स्कॉटलँडने वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. स्कॉटलँडची ही वूमन्स टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे स्कॉटलँडमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. वर्ल्ड कपसाठी नियमित कर्णधार कॅथरीन ब्राईस हीचं पुनरागमन झालं आहे. कॅथरीन नेदरलँड्समध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे आणि टी 20 मालिकेचा भाग नव्हती. मात्र आता या मोठ्या स्पर्धेत तिच्याकडे नेतृत्वाची सूत्र आहेत. तर सारा ब्राईस हीला उपकर्णधार आहे.
स्कॉटलँड टीम बी ग्रुपमध्ये आहे. स्कॉटलँडसह या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्टइंडिज आणि बांगलादेशचा समावेश आहे. स्कॉटलँडने पात्रता फेरीतून वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलंय. स्कॉटलँड ही क्वालिफायर 2 टीम आहे. तर श्रीलंका क्वालिफायर 1 टीम आहे. इतर 8 संघांनी आयसीसी रँकिगच्या निकषावर थेट वूमन्स वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. मात्र श्रीलंका आणि स्कॉटलँडला पात्रता फेरीत इतर संघांना पराभूत करुन इथवर यावं लागलं आहे. त्यात स्कॉटलँडची ही टी 20 वर्ल्ड कप खेळण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे स्कॉटलँड वूमन्स टीमच्या कामगिरीकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
स्कॉटलँड वूमन्सची पहिलीच टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा
Our first-ever ICC Women’s @T20WorldCup squad 🔥🔥🔥#FollowScotland
— Cricket Scotland (@CricketScotland) September 2, 2024
वूमन्स टी 20 वर्ल्ड कपसाठी स्कॉटलँड टीम : कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस (उपकर्णधार), लोर्ना जॅक-ब्राउन, अबी एटकेन-ड्रमंड, अबताहा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लो एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅककोल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हन्ना रेनी, राहेल स्लेटर, कॅथरिन फ्रेझर आणि ऑलिव्हिया बेल.