मुंबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिनशाह आफ्रिदीने ‘द हंड्रेड’ या लीगमध्ये राडा घातला आहे. आपल्या बॉलिंगने विरोधी संघातील खेळाडूंच्या दांड्या गुल केल्या आहेत. वेल्श फायर वि. मँचेस्टर ओरिजिनल्समधील सामन्यामध्ये शाहिनशाह आफ्रिदीने खतरनाक स्पेल टाकला. वेल्श फायरकडून खेळणाऱ्या आफ्रिदीने आपल्या पहिल्या दोन बॉलवर दोन विकेट घेतल्या.
पाहा व्हिडीओ- :
? Shaheen Afridi with a wicket off his first ever ball in The Hundred.
It’s a mystery how he does it so frequently. All batters know there is a Yorker or a full-length delivery coming in the first over and they still can’t play it! pic.twitter.com/dtNC7eEf0j
— Mazher Arshad (@MazherArshad) August 2, 2023
शाहिशाह आफ्रिदीने आपल्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्या. आफ्रिदीने टाकलेले दोन्ही यॉर्कर इतके खतरनाक होते की फिलिप सॉल्ट आणि लॉरी इव्हान्स या दोघांनाही त्याच्या यॉर्करचं उत्तर नव्हतं. पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्याने मँचेस्टर ओरिजिनल्स संघ बॅकफूटला ढकलला गेला.
पावसामुळे हा सामना 40 बॉल्सचा करण्यात आला होता. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेल्श फायर संघाने 94-7 धावा केल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मँचेस्टर ओरिजिनल्स संघाला 85 धावा करता आल्या.
टॉम एबेल (C), जो क्लार्क (W), स्टीफन एस्किनाझी, ल्यूक वेल्स, ग्लेन फिलिप्स, डेव्हिड विली, डेव्हिड पायने, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, बेन ग्रीन, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी
D (wk), जोस बटलर (c), लॉरी इव्हान्स, मॅक्स होल्डन, अॅश्टन टर्नर, पॉल वॉल्टर, जेमी ओव्हरटन, उसामा मीर, टॉम हार्टले, जोशुआ लिटल, जोश टंग