मुंबई : वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये झालेला वाद संपूर्ण क्रिकेट विश्वाने पाहिला. मॅथ्यूज याला टाईम आऊट देण्यात आलं होतं, क्रिकेट जगतामध्ये या निर्णयावरून अंपायर आणि बांगलादेश संघावर जोरदार टीका होत असल्याची पाहायला मिळत आहे. अशाताच बांगलादेशलाही मोठा धक्का बसला असून शाकिब अल हसन हा वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
🚨 JUST IN: Bangladesh’s star player has been ruled out of their final #CWC23 match against Australia!
Details 👇https://t.co/ae0wgYT9Xi
— ICC (@ICC) November 7, 2023
श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात बॅटींग करताना शाकिबच्या बोटाला दुखापत झाली होती. सामन्यानंतर एक्स रे मध्ये त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात शाकिब खेळताना दिसणार नाही.
श्रीलंका संघ प्रथम बॅटींगला उतरला होता, सामन्याच्या २५ व्या ओव्हरमध्ये शाकिब अल हसन याने सदीरा समराविक्रमा याला आऊट केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात अँजलो मॅथ्यूज आला, तो आल्यावर त्याच्या हेल्मेटची स्ट्रीप टाईट करत असताना ती तुटली त्यानंतर त्याने नवीन हेल्मेट मागवलं. यादरम्यान शाकिबने अंपायरकडे टाईम आऊटची अपील केली. सुरूवातीला अंपायरला वाटलं चेष्टा करत होते मात्र त्याने आपण खरंच अपील करत असल्याचं सांगितलं. थोडा वेळ घेतला त्यानंतर मॅथ्यूज याला आऊट देण्यात आलं.
दरम्यान, या निर्णयावरून माजी खेळाडू हरभजन सिंह याने पंचांवरच निशाणा साधला. तुम्हाला खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे की नियम? जर मॅथ्यूजचं तुटलेल्या हेल्मेटने खेळला असता आणि त्यावर बॉल बसला असता तर ते उडून पडलं असतं, असं हरभजनने म्हटलं आहे.
शाकिब अल हसन (C), लिटन कुमेर दास, तन्झीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (CV), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन मोहम्मद, शरीफुल इस्लाम , तनझिम हसन साकीब