नवी दिल्ली : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs WI) सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) शुक्रवारी शानदार खेळ दाखवला पण शतक हुकलं. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या या सामन्यात त्यानं सलामी करताना 99 चेंडूत 97 धावा केल्या. डावाच्या 34व्या षटकात धवनला गुडाकेश मोतीने शामर ब्रूक्सच्या हाती झेलबाद केलं. ब्रूक्सनं (Shamarh Brooks) ‘सुपरमॅन’च्या शैलीत डायव्हिंग करताना धवनचा झेल घेतला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या शिखर धवननं शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात केली आणि 119 धावांची सलामी दिली. शुभमन गिल 53 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 64 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर धवनने श्रेयस अय्यरसह डाव पुढे नेत विरोधी संघाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
Superhuman catch from #ShamarhBrooks, and @SDhawan25 goes for 97. Breaking hearts can be heard everywhere.
हे सुद्धा वाचाWatch the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode ?https://t.co/RCdQk12YsM@windiescricket @BCCI#WIvIND #INDvsWIonFanCode pic.twitter.com/4tgrGyte8E
— FanCode (@FanCode) July 22, 2022
धवन मोठ्या लयीत दिसत होता आणि तोही शतक पूर्ण करेल असं वाटत होतं. डावाच्या 34व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने डीप मिड-विकेटच्या दिशेनं षटकारही मारला, पण पुढच्याच चेंडूवर ब्रूक्सने त्याचा झेल घेतला. दिल्लीच्या या खेळाडूने 99 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकलं.
2010 मध्ये याच फॉरमॅटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिखर धवननं आतापर्यंत वनडेमध्ये 45 पेक्षा जास्त सरासरीनं 17 शतके आणि 36 अर्धशतकं झळकावली आहेत. यापूर्वी तो इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं नाबाद 31 धावा केल्या पण त्यानंतर दोघेही एकदिवसीय सामन्यात फक्त 10 (9 आणि 1) धावा करू शकले.
शुभमन गिलनं 64 धावा करून पुनरागमन केलं तर कर्णधार शिखर धवनचं शतक तीन धावांनी हुकलं. पण, या जोडीनं शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताला 7 बाद 308 धावा केल्या. डिसेंबर 2020 नंतर पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या गिलनं 52 चेंडूत 64 धावा केल्या तर धवननं 99 चेंडूत 97 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं 57 चेंडूत 54 धावा केल्या. धवन आणि गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 106 चेंडूत 119 धावांची भागीदारी केली. गिल 18व्या षटकात धावबाद झाला. पण, त्यानं आपल्या डावात अनेक आकर्षक शॉट्स मारले. त्यानं अल्झारी जोसेफला षटकार ठोकला आणि त्यानंतर शानदार चौकार मारला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. दरम्यान ब्रूक्सची सामन्यात चांगली चर्चा होती. त्याच्या फ्लाईंग कॅच चांगलाच चर्चेत राहिलाय. तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला.