पालघर | टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाला. शार्दुल ठाकूर याने त्याची लहानपणाची मैत्रीण मिताली पारुळकरसोबत सप्तपदी घेतल्या. मोजक्या जणांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. त्यामुळे सर्वांनाच इच्छा असूनही लग्नाला उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे शार्दुल आणि मिताली या दोघांनी पालघरमध्ये रिसेपशनचं आयोजन केलं. शार्दुलच्या या लग्नसमारंभाला गाळबोट लागल्याचं समोर आलं आहे. या रिसेपशनमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि भरत राजपूत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला आहे. भरत राजपूत हे डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत. शार्दुल ठाकूरच्या लग्नसमारंभात हा राडा झाला. मात्र या राड्यानंतर मध्यस्थीनंतर कार्यकर्ते शांत झाले. त्यामुळे पुढील वाद टळला. मात्र या दोन्ही गटांमध्ये राडा होण्याचं कारण समजू शकलेलं नाही.
शार्दुल ठाकूर याच्या रिसेपशनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शार्दुल आणि मिताली या दोघांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेस आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार मनीषा चोधरी यांची ही उपस्थिती होती.
दरम्यान शार्दुलचा हळदी समारंभ शुक्रवारी 24 मार्चला पार पडला. शार्दुलचा या हळदी समारंभातील डान्सचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. शार्दुलने झिंगाट डान्सवर बुंगाट डान्स केला होता. त्यानंतर रविवारी 26 फेब्रुवारीला संगीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शार्दुलने मितालीसह रोमॅन्टिक डान्सही केला.
शार्दुल-मिताली यांचा साखरपुडा हा 29 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला होता. त्यानंतर टी 20 वर्ल्ड 2022 कपआधी हे दोघे गोव्यात लग्न करणार होते. मात्र काही कारणांमुळे गोव्यात लग्न होणं शक्य झालं नाही. तसेच लग्नही पुढं ढकलावं लागलं होतं. मात्र अखेर 15 महिन्यांच्या अंतरानंतर विवाह पार पडला.
मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल आणि मिताली हे दोघेही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत होते. अखेर या अनेक वर्षांच्या पार्टनरशीपनंतर दोघेही लाईफ पार्टनर झाले आहेत.
फेब्रुवारी 2020 मध्ये मिताली पारुळकर स्वत:ची बेकरी कंपनी सुरु केली. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ तिच्या कंपनीचे नाव आहे. ती बिझनेसवुमन असून फेब्रुवारी 2020 पासून व्यवसाय संभाळतेय. या कंपनीची स्वत:ची वेबसाइट आहे. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ कंपनीकडून वेगवेगळे केक, कुकी, ब्रेड, बनस बनवले जातात. हा ब्रांड यशस्वी ठरला आहे.