IND vs SL मालिकेतून शार्दुल ठाकूर, केएल राहुलला विश्रांती, जाडेजा-कुलदीपचं कमबॅक, बुमराहकडे उपकर्णधारपद

| Updated on: Feb 19, 2022 | 5:56 PM

क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या सर्व नियमित खेळाडूंना वेळोवेळी बायो बबलमधून ब्रेक दिला जाईल आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळेच बीसीसीआयने कोहली, पंत आणि ठाकूरला विश्रांती दिली आहे.

IND vs SL मालिकेतून शार्दुल ठाकूर, केएल राहुलला विश्रांती, जाडेजा-कुलदीपचं कमबॅक, बुमराहकडे उपकर्णधारपद
Shardul Thakur
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या आगामी T20I आणि कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघांची निवड केली आहे. टीम इंडिया लखनौ आणि धर्मशाला येथे अनुक्रमे तीन T20I आणि मोहाली आणि बेंगळुरू येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारताच्या कसोटी संघातून अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे  या दोघांना डच्चू दिला आहे. तर सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) विश्रांती देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. तर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि T20 मालिकेसाठी शार्दुल ठाकूरला विश्रांती दिली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दिली आहे. बीसीसीआयने निर्णय घेतला होता की सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या सर्व नियमित खेळाडूंना वेळोवेळी बायो बबलमधून ब्रेक दिला जाईल आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळेच बीसीसीआयने कोहली, पंत आणि ठाकूरला विश्रांती दिली आहे.

आगामी काळात भारताला सातत्याने क्रिकेट खेळायचे आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर अफगाणिस्तानविरुद्धदेखील मालिका सुरू झाल्याची बातमी आहे. त्यानंतर आयपीएल आहे. आयपीएलनंतर भारताला कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जावे लागले तर दक्षिण आफ्रिकेचा संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. वर्षाच्या अखेरीस T20 विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक मालिका खेळवली जाईल.

दरम्यान, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे गेले काही महिने टीम इंडियापासून लांब होता. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने काही आठवडे बंगळुरुतल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घालवले. फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर आता त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच फिरकीपटून कुलदीप यादवचंदेखील टीम इंडियाच कमबॅक पाहायला मिळणार आहे.

रोहित कर्णधार, बुमराह उपकर्णधार

भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्यानंतर विराटने कसोटी कर्णधारपददेखील सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढचा कसोटी कर्णधार कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र बीसीसीआयने ही जबाबदारीदेखील रोहितवरच सोपवली आहे. दुसऱ्या बाजूला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या वाईट फॉर्ममुळे आधी उपकर्णधारपद आणि आता संघातलं स्थानदेखील गमावलं आहे. त्यामुळे भारताचा उपकर्णधार कोण असेल याचीदेखील चिंता होती. बीसीसीआयने ही जबाबदारी जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहवर सोपवली आहे.

रहाणे-पुजाराला डच्चू

रहाणे आणि पुजाराच्या जागी प्रियांक पांचाळ आणि श्रेयस अय्यरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं जाईल. तर रोहित शर्मासोबत मयंक अग्रवाल किंवा शुभमन गिल सलामीला मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुजाराच्या जागेसाठी हनुमा विहारीदेखील प्रबळ दावेदार आहे. दरम्यान, रवींद्र जाडेजाने टीम इंडियात पुनरागमन केलं आहे.

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

भारताचा टी-20 संघ : भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान

संघातून कोण बाहेर गेलं? चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, ऋद्धिमान साहा संघातून बाहेर

फिटनेसमुळे केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांचा श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजसाठी आराम देण्यात आला आहे. शार्दुल टेस्ट आणि टी-20 दोन्ही संघांमध्ये नसणार आहे.

इतर बातम्या

23 वर्षीय फलंदाजाची कमाल, रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियातला रेकॉर्ड मोडित

IND vs WI: सामन्यानंतर रोहित शर्माला नाराजी लपवता आली नाही, म्हणाला….

Rishabh Pant: सीरीज सुरु असताना मध्यावरच BCCI ने ऋषभ पंतला दिला आराम