Video : रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शार्दुल ठाकुरचं धूमशान! उडी मारून मुक्का मारला आणि दाखवलं बोट

| Updated on: Mar 04, 2024 | 12:25 PM

बीसीसीआयच्या आक्रमक पवित्र्यानंतर रणजी ट्रॉफी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण दिग्गज खेळाडूंनी राष्ट्रीय संघात नसताना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. उपांत्य फेरीत मुंबई विरुद्ध तामिळनाडू हा सामना सुरु आहे. या सामन्यात शार्दुल ठाकुरचं आक्रमक सेलिब्रेशन पाहायला मिळाल.

Video : रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शार्दुल ठाकुरचं धूमशान! उडी मारून मुक्का मारला आणि दाखवलं बोट
Video : रणजी ट्रॉफीत शार्दुल ठाकुरने दाखवलं रौद्र रुप, आक्रमक रुपाला ड्रेसिंग रुमधून अजिंक्य रहाणनेही दिलं समर्थन
Image Credit source: video grab
Follow us on

मुंबई : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. गेली अनेक वर्षे मुंबईने रणजी ट्रॉफीत वर्चस्व गाजवलं आहे. यंदाही मुंबई जेतेपदासाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. उपांत्य फेरीत मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात सामना सुरु आहे. तामिळनाडूने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या गोलंदाजांनी तामिळनाडूला बॅकफूटवर ढकललं. 146 धावांवर तामिळनाडूचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. त्या प्रत्युत्तरात मुंबईची सुरुवातही अडखळत झाली. संघाच्या 106 धावा असताना 7 गडी तंबूत परतले होते. त्यामुळे मुंबई संघावर दडपण आलं होतं. आघाडीच्या फलंदाजांपैकी मुशीर खान सोडला तर एकही फलंदाज तग धरू शकला नाही. पृथ्वी शॉ 5, भुपेन ललवानी 15, मोहित अवस्थि 2, अजिंक्य रहामे 19, श्रेयस अय्यर 3, शम्स मुलानी 0 आणि हार्दिक टमोरे 35 धावा करून बाद झाले. मुंबईची अशी स्थिती असातना शार्दुल ठाकुर आणि तनुश कोटीयन या जोडीने कमाल केली.

आठव्या गड्यासाठी शार्दुल ठाकुर आणि हार्दिक टमोरे यांनी 105 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तनुष कोटियनसोबत 79 धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकुरने 105 चेंडूत 109 धावांची खेळी केली. यात 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे मुंबईला 378 धावांपर्यंत मजल मारता आली. शार्दुल ठाकुर 81 वा फर्स्ट क्लास सामना खेळत आहे. तसेच त्याच्या कारकिर्दितील पहिलं शतक आहे. त्याने लाँग ऑफल षटकार मारून शतक पूर्ण केलं. षटकार कन्फर्म झाल्यानंतर त्याने हवेत उडी घेत मुक्का मारला. तसेच आक्रमकपणे ड्रेसिंगरुमकडे बोट दाखवलं.

शार्दुल ठाकुरच्या आक्रमक शैलीची सध्या चर्चा होत आहे. त्याने आक्रमकपणे बोट कोणाला दाखवलं त्याबाबत काही कळू शकलं. त्याबाबत आता शार्दुल ठाकुरच सांगू शकेल. टीमला शतक समर्पित करण्यासाठी त्याने असं केलं. तसेच संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनंही त्याच्या शतक आणि शैलीचं टाळ्या वाजवून समर्थन केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

तामिळनाडू : साई सुदर्शन, नारायण जगदीसन (विकेटकीपर), प्रदोष पॉल, रविश्रीनावसन साई किशोर (कर्णधार), बाबा इंद्रजीत, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजिथ राम, संदीप वॉरियर, कुलदीप सेन

मुंबई : पृथ्वी शॉ, भुपेन ललवानी, मुशीर खान, मुशीर खान, मोहित अवस्थी, शार्दुल ठाकुर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शम्स मुलानी, हार्दिक ठोमरे, तनुश कोटियन, तुषार देशपांडे.