मुंबई | टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आणि मुंबईकर शार्दुल ठाकुर याने धमाका केला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उंपात्य फेरीतील निर्णायक सामन्यात शार्दूल ठाकुर याने धमाकेदार शतक ठोकलं आहे. शार्दुलने बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या स्टेडियमवर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक झळकावलं. शार्दुलने सिक्ससह शतक पूर्ण केलं. मुंबई अडचणीत असताना शार्दुलने हार्दिक तामोरे याच्यासह डाव सावरला. त्यानंतर शार्दुलने अर्धशतक झळकावलं. शार्दुलने अर्धशतकानंतर टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत सेंच्यूरी पूर्ण केली.
शार्दुलने मुंबईच्या डावातील 81 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर तामिळनाडूच्या बाबा इंद्रजीथ याच्या बॉलिंगवर पुढे येत खणखणीत सिक्स खेचला आणि शतक पूर्ण केलं. शार्दुलने 89 बॉलमध्ये आपलं पहिलवहिलं शतक पूर्ण केलं. शार्दुलच्या या शतकी खेळीत 12 चौकार आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर शार्दुलने 113.5 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं.
दरम्यान शार्दुलने हार्दिक तामोरे आणि तुनष कोटीयन यांच्यासह भागीदारी करत मुंबईचा डाव सावरत मजबूत स्थितीत आणून ठेवलं. मुंबईने मुशीर खान याच्या रुपात 6 वी विकेट गमावल्यानंतर शार्दूल ठाकुर मैदानात आला. मुशीरनंतर शम्स मुलानी आऊट झाला. मुंबईने सातवी विकेट गमावली. त्यानंतर शार्दुलने हार्दिक तामोरे याच्यासह आठव्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक 35 धावा करुन आऊट झाला. हार्दिकनंतर तनुष मैदानात आला. शार्दुलने तनुषसोबत नवव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर शार्दुल 105 बॉलमध्ये 109 धावा करुन आऊट झाला. शार्दुलच्या या खेळीत 4 सिक्स आणि 13 फोर समावेश होता.
शार्दुलचा शतकी धमाका
Shardul Thakur gets to his century in style 🔥🔥
What a time to score your maiden first-class 💯
The celebrations say it all 👌👌@imShard | @IDFCFIRSTBank | #RanjiTrophy | #MUMvTN | #SF2
Follow the match ▶️ https://t.co/9tosMLk9TT pic.twitter.com/3RI9Sap6DO
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 3, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.
तामिळनाडू प्लेईंग ईलेव्हन | रविश्रीनिवासन साई किशोर (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, बाबा इंद्रजीथ, प्रदोष पॉल, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजित राम, संदीप वॉरियर आणि कुलदीप सेन.