कडक ना भावा! शार्दुल ठाकूर याने घेतलेला उखाणा ऐकलात का, पाहा व्हिडीओ

| Updated on: Mar 01, 2023 | 7:55 PM

आताच लग्न झालेल्या शार्दुल ठाकूर याने आपल्या पत्नीसाठी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

कडक ना भावा! शार्दुल ठाकूर याने घेतलेला उखाणा ऐकलात का, पाहा व्हिडीओ
Follow us on

मुंबई : भारताचा युवा खेळाडू शार्दुल ठाकूर नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. 27 फेब्रुवारीला त्याने आपली गर्लफ्रेंड मिताली पारुळकरसोबत आयुष्याचे सात फेरे घेतले. कर्जतमध्ये दोघांचा मराठी रीतिरिवाजांनी विवाहसोहळा पार पडला. शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच लग्नानंतर सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजे नवरा-बायको काय उखाणा घेतात याची, अशाच प्रकारे शार्दुल ठाकूरने आपल्या पत्नीसाठी काय उखाणा घेतला याची उत्सुकताही त्याच्या चाहत्यांना होती. शार्दुलचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा शार्दुलने कोणता उखाणा घेतला

 

 

शार्दुलने आपल्या पत्नीसाठी एक खास उखाणा घेतला. आपल्या प्रोफेशनला जोडून मितालीची स्तुती करणारा उखाणा त्याने घेतला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये’बॉलिंग करतो क्वीक, रन पण धावतो क्वीक; मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक’, असा उखाणा त्याने घेतलेला आहे. उखाणा झाल्यावर त्याची पत्नी मितालीलाही हा उखाणा आवडल्याचं दिसलं. शार्दुलने थांबत थांबत घेतलेला उखाणा ऐकल्यावर मिताली टाळ्या वाजवताना दिसली.

कोण आहे मिताली पारुळकर?

मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल आणि मिताली हे दोघेही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत होते. अखेर या अनेक वर्षांच्या पार्टनरशीपनंतर दोघेही लाईफ पार्टनर झाले आहेत.

शार्दुलच्या बायकोच्या कंपनीच नाव काय?
फेब्रुवारी 2020 मध्ये मिताली पारुळकर स्वत:ची बेकरी कंपनी सुरु केली. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ तिच्या कंपनीचे नाव आहे. ती बिझनेसवुमन असून फेब्रुवारी 2020 पासून व्यवसाय संभाळतेय. या कंपनीची स्वत:ची वेबसाइट आहे. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ कंपनीकडून वेगवेगळे केक, कुकी, ब्रेड, बनस बनवले जातात. हा ब्रँड यशस्वी ठरला आहे.