मुंबई : बांगलादेश दौऱ्यासाठी महिला क्रिकेट संघाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिला डावलण्यात आलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिखा पांडे हिने डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडू खेळताना सर्वाधिक विकेट घेतले होते. दिल्ली कॅपिटल्स संघ या स्पर्धेत उपविजेता ठरला होता. यापूर्वीही शिखा पांडे हिला कोणतंही कारण न सांगता संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. शिखा पांडे हिची यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पुनरागमन झालं होतं. त्यानंतर तिला बीसीसीआय करारातून डावलण्यात आलं होतं. आता बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे.
शिखा पांडे हीने सांगितलं की, “तुम्ही जितकी मेहनत घेता आणि त्याचं योग्य फळ मिळत नाही तेव्हा वाईट वाटतं. मला माहिती आहे की, माझी निवड न होण्यामागे काही कारण असेल. पण त्याबाबत मला माहिती नाही. माझ्या हातात फक्त परिश्रम करणं आहे आणि परिश्रमावर माझा दृढ विश्वास आहे. जिथपर्यंत मी मानसिक आणि शारिरीक दृष्टीने फिट आहे, तिथपर्यंत परिश्रम करतच राहणार.”
?️ Shikha Pandey gets teary-eyed talking about the disappointment of not finding a place in the Indian team.
Watch the full interview with @wvraman here ➡️ https://t.co/9H20WnkoZG#WednesdaysWithWV | #WomensCricket pic.twitter.com/d5tJmro6SC
— Sportstar (@sportstarweb) July 6, 2023
शिखा पांडे हीने पुढे सांगितलं की, “मला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला तेव्हा मी विचार केला की लांब राहणंच योग्य आहे. तेव्हा मला भावनात्मक वेळ असल्याचं सांगितलं गेलं. माझ्याकडे खूप क्रिकेट अजून बाकी आहे, असं तुम्हालाही वाटतं. मला आनंद मिळतोय तिथपर्यंत खेळायचं आहे. मी यावेळी निराश आहे पण ज्या स्थितीत टाकलं गेलं ते माझ्या हाती नाही. यातून बाहेर कसं निघायचं ते मात्र माझ्या हाती आहे.”, असं शिखा पांडे यांनी पुढे सांगितलं.
शिखा पांडे हिची निवड न झाल्याने क्रीडाप्रेमींसह माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “जर मी असं सांगितलं की, मी निराश किंवा रागवलो नाही तर मी माणूस नाही.” दुसरीकडे, शिखा पांडे हिला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
शिखा पांडे टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाकडून खेळली आहे. वर्ल्ड कप 2022 मध्ये शिखाची संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे निवड समितीवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये शिखा पांडे हीला स्थान मिळालं होतं.