Video : पंजाबला पहिला झटका, जोस बटलर बनला सुपरमॅन, एका हातानं घेतली अप्रतिम कॅच, पाहा Highlights Video

| Updated on: May 07, 2022 | 4:37 PM

शिखर धवनने 16 बॉलमध्ये 12 धावा काढल्या असून 2 चौकार मारले आहे.

Video : पंजाबला पहिला झटका, जोस बटलर बनला सुपरमॅन, एका हातानं घेतली अप्रतिम कॅच, पाहा Highlights Video
बटलने पकडली अप्रतिम कॅच
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्सला पहिला झटका बसला असून शिखर धवन आऊट झालाय. शिखर धवनने 16 बॉलमध्ये 12 धावा काढल्या असून 2 चौकार मारले आहे. दरम्यान, अश्विनच्या बॉलवर जोस बटलरने शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली आहे. या कॅचची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे बटलरने एका हातात ही कॅच घेतली आहे. ही कॅच घेताना बटलर पूर्णपणे मागे झुकला होता. यावेळी तो पडण्याची देखील शक्यता होती. पण बटलरची तुफान खेळी तुम्हाला माहितच आहे. त्याने ज्या प्रकारे शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली. त्यावेळी उपस्थित देखील एकच जल्लोष करताना दिसून आले. बटरलच्या संघाचा म्हणजे राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने एकूण 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 6 सामन्यात जिंकता आलंय. तर 4 सामन्यात राजस्थान संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान संघाचा नेट रेट 0.340 आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानला एकूण बारा पॉईंट्स मिळाले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना होतोय.

जोस बटलरने घेतलेली अप्रतिम कॅच, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

दोन्ही संघाचे प्लेईंग इलेवन

पंजाब किंग्जचा संभाव्य संघ – मयंक अग्रवाल (क), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (क), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

ऐनवेळी काही बदल?

पॉईंट्स टेबलचं गणित

पंजाबने एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर तितक्याच सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. पंजाब किंग्स संघाचा नेट रेट -0.229 इतका आहे. आयपीएलच्या गुणतालिकेच पंजाबला 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने एकूण 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 6 सामन्यात जिंकता आलंय. तर 4 सामन्यात राजस्थान संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान संघाचा नेट रेट 0.340 आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानला एकूण बारा पॉईंट्स मिळाले आहे.