World Cup 2023 साठी टीममधून वगळलं, शिखर धवन याची पोस्ट व्हायरल, म्हणाला…

| Updated on: Sep 07, 2023 | 12:27 AM

Shikhar Dhawan Reaction On India World Cup Squad : गेल्या वर्षेभरापासून संघापासून दूर असलेल्या शिखर धवन याची वर्ल्ड कप संघात काही निवड नाही झाली. अशातच धवन याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

World Cup 2023 साठी टीममधून वगळलं, शिखर धवन याची पोस्ट व्हायरल, म्हणाला...
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे, रोहित शर्मा आणि निवड समितीचे मुख्य अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत 15 खेळाडूंची घोषणा केलीय. या संघामध्ये अनेक मोठी नावं संघाबाहेर असून त्यातील एक नाव म्हणजे शिखर धवन. आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये सर्वात जास्त यशस्वी ठरलेल्या  खेळाडूंमध्ये गब्बर स्पेशल आहे. मात्र गेल्या वर्षेभरापासून संघापासून दूर असलेल्या शिखर धवन याची वर्ल्ड कप संघात काही निवड झाली आहे. अशातच त्याने केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे.

शिखर धवन याची पोस्ट

 

धवन काय म्हणाला पोस्टमध्ये-

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी निवड झालेल्या माझ्य सर्व सहकारी खेळाडूंचं अभिनंदन. 150 कोटी जनतेचे आशिर्वाद तुमच्या पाठिशी आहेत. तुम्ही त्यांच्या एका स्वप्नाला पुढे घेऊन जात आहात. वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून आणी आणि तुमचा सर्वांना अभिमान वाटेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे.

शिखर धवन याने यंदाच्या वर्षी एकही सामना खेळला नाही. त्याने टीम इंडियासाठी अखेरचा सामना 2022 मध्ये बांगलादेशविरूद्ध खेळला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला संघात एन्ट्री मिळाली नाही. शिखर धवन याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत.

दरम्यान, यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये  होणार असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 8 ऑक्टोबरला टीम इंडियाच्या मिशन वर्ल्डला सुरूवात होणार आहे. तशी वर्ल्ड कप महासंग्रामाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे.

वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाचा संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.