मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही खेळाडूंसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे खेळाडूंना चांगलं प्रदर्शन करून आत्मविश्वासाने वर्ल्डकप स्पर्धेत उतरावं लागणार आहे. कारण या मालिकेतील खेळाडूंच्या प्रदर्शनावर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कारण या मालिकेतील प्रदर्शनावर काही खेळाडूंची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. कारण संघ बदलण्याची अंतिम मुभा 28 सप्टेंबरपर्यंत आहे. तसेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका 27 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे खेळाडूंचं आकलन आणि फॉर्म पाहून संधी द्यायची की नाही हे ठरणार आहे. अशात खेळाडूंना एखादी चूक चांगलीच महागात पडू शकते. श्रेयस अय्यर याच्या हातून अशीच एक चूक झाली आहे. पाटा पिचवर विकेट मिळणं कठीण असताना श्रेयस अय्यरने कॅच सोडली.
कर्णधार केएल राहुल याने संघाचं नववं षटक शार्दुल ठाकुर याला सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वॉर्नर चौकार मारला. त्यानंतर शार्दुलने कमबॅक करत दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार आला. कमबॅक करत पाचवा चेंडू निर्धाव टाकला आणि सहाव्या चेंडूवर अपेक्षित टप्पा टाकत थेट श्रेयस अय्यरच्या हाती चेंडू गेला. पण श्रेयस अय्यरने कॅच ड्रॉप केला. याची नाराजी शार्दुल ठाकुरच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
Ohhh 😯😯😯 Catch dropped by Shreyas Iyer !!!#INDvAUS pic.twitter.com/pbzX3HpOM6
— Harsh Parmar (@HarshPa56785834) September 22, 2023
श्रेयस अय्यरने वॉर्नरचा कॅच सोडला तेव्हा वॉर्नर फक्त 14 धावांवर होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 40 धावा होत्या. वॉर्नरची विकेट गेली असती तर संघावर दडपण वाढलं असतं. पण कॅच सोडल्याने वॉर्नरला आणखी एक संधी मिळाली. त्याने भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. पाटा विकेट असल्याने संघाच्या धावा 300 च्या वर होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲडम झम्पा
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर) इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी